शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर शहरात १० हजार कापडी पिशव्या वाटपाचा शुभारंभ, स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी सहकार्य करा, आ़ प्रशांत परिचारक यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 17:12 IST

शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरे स्वच्छ व सुंदर व्हावीत, या हेतूने हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी पंढरपूर शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ. प्रशांत परिचारक यांनी केले.

ठळक मुद्देपंढरपूर नगरपरिषद व बँक आॅफ इंडिया यांच्या वतीने शहरातील नागरिकांना १० हजार कापडी पिशव्या वाटपशहरामध्ये निर्माण होणारा कचरा व या कचºयाचे विलगीकरण करुन या कचºयावर प्रक्रिया करुन खत निर्मिती करण्यात येणारनगरपरिषदेने कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी आपल्या दारापर्यंत उपलब्ध करु

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि १७ : केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ४ जानेवारी २०१८ पासून स्वच्छ सर्वेक्षण  २०१८ हे अभियान सुरु केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह भारतभर हे अभियान राबविण्यात येत आहे. शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरे स्वच्छ व सुंदर व्हावीत, या हेतूने हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी पंढरपूर शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ. प्रशांत परिचारक यांनी केले.पंढरपूर नगरपरिषद व बँक आॅफ इंडिया यांच्या वतीने शहरातील नागरिकांना १० हजार कापडी पिशव्या वाटपाचा शुभारंभ आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा साधना नागेश भोसले होत्या. यावेळी नगरसेवक दगडू धोत्रे, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, बँक आॅफ इंडियाचे मुख्य प्रबंधक तितरे व माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले उपस्थित होते.संपूर्ण देशात प्लास्टिक कचºयाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. शहरामध्ये निर्माण होणारा कचरा व या कचºयाचे विलगीकरण करुन या कचºयावर प्रक्रिया करुन खत निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे  शहर स्वच्छ राहावे, नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे  या हेतूने पंढरपूर शहरातील नागरिकांनी पंढरपूर शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी शहरातील व्यापारी, व्यावसायिक, रहिवासी, भाविक, मठ व मंगल कार्यालय, इतर नागरिकांनी आपल्या घरामध्ये अथवा व्यवसायाच्या ठिकाणी ओला  व सुका कचºयासाठी दोन स्वतंत्र डबे ठेवावेत, नगरपरिषदेने कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी आपल्या दारापर्यंत उपलब्ध करुन दिली आहे, असे त्यांनी सांगितले.हे स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, आरोग्याधिकारी डॉ. संग्राम गायकवाड, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, बर्मा पवार, मारुती मोरे, कुमार भोपळे हे प्रयत्नशील आहेत.यावेळी माजी नगराध्यक्ष सतीश मुळे, लक्ष्मण शिरसट, नगरसेविका सुप्रिया डांगे, वामनराव बंदपट्टे, संजय निंबाळकर, विशाल मलपे, विक्रम शिरसट, विवेक परदेशी, ऋषीकेश उत्पात, नरसिंह शिंगण, सुजितकुमार सर्वगोड, सामाजिक कार्यकर्ते सचिन डांगे, अमोल डोके, बसवेश्वर देवमारे, नितीन शेळके, धर्मराज घोडके हे उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूर