सोलापूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवातील सांगता मिरवणुकीमध्ये डीजेवर चढलेला तरुण रोडवर आपटून जखमी झाला. रविवारी रात्री ११ च्या सुमारास सोलापुरातील कामत चौकातील रोडवर ही घटना घडली. सचिन मच्छिंद्र माने (२६, रा. विजापूर रोड, सोलापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
सोलापुरात दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लक्षवेधी मिरवणूक निघते. ही मिरवणूक पाहण्यासाठी पुणे, मुंबईबरोबरच परराज्यातल्या मंडळींची उपस्थिती असते.
रविवारच्या रात्री ११ च्या सुमारास यातील जखमी सचिन माने हा तरुण कामत चौकात मंडळाच्या मिरवणुकीतील डीजेवर चढला. अचानक त्याचा तोल जाऊन रोडवर पडल्याने तो जखमी झाला. यामध्ये त्याच्या डोक्याला जखम झाली. तातडीने उपचारासाठी रात्री ११:३० च्या सुमारास तो स्वत: दाखल झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.