शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसात सोलापुरात कोरोनाचा दुसरा बळी; रूग्णसंख्या पोहोचली ३८ वर

By appasaheb.patil | Updated: March 20, 2023 19:01 IST

आठ दिवसात सोलापुरात कोरोनाचा दुसरा बळी आढळला आहे. 

सोलापूर : शहरात कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. शहर व जिल्ह्यातील रूग्णसंख्या ३८ वर पोहोचली आहे. यात शहरातील ३० तर ग्रामीणमधील ८ रूग्णांचा समावेश आहे.

शहरातील मयत महिला ही बंडे नगर (जुळे सोलापूर) परिसरातील ६४ वर्षाची आहे. त्या महिलेस दोन दिवसांपासून उलटी, ताप असल्याने ११ मार्च २०२३ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचारा दरम्यान १७ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्या महिलेचा मृत्यू झाला. त्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी १८ रूग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती, सर्वच सर्व रूग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत शहरात ३४ हजार ५९३ कोरोनाचे रूग्ण असून आतापर्यंत झालेल्या मृतांचा आकडा १ हजार ५१८ एवढा आहे. ३३ हजार ४५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

माढ्यात आढळला कोरोनाचा रूग्णसोमवारी जिल्हा आरोग्य विभागाचा कोरोना रिपोर्ट जाहीर झाला, त्यात माढा तालुक्यात कोरोनाचा रूग्ण आढळल्याचे सांगण्यात आले. रविवारी २० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती, त्याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला. त्यात १९ जणांचा रिपेार्ट निगेटिव्ह आला असून एकाचा रिपेार्ट पॉझिटिव्ह आला आले. ग्रामीणमधील एकूण रूग्णसंख्या १ लाख ८७ हजार ४२१ एवढी झाली असून मृतांची संख्या ३ हजार ७२१ एवढी पोहोचली आहे. सध्या ग्रामीण भागात दक्षिण सोलापूर २, सांगोला १, उत्तर सोलापूर १, माढा १, बार्शी २ असे ८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या