शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वीजपुरवठा काही केल्या सुधारेना

By admin | Updated: November 18, 2014 14:53 IST

मध्यरात्री म्हणजे रात्री साडेबारा वाजता येणारी वीज काही मिनिटेही चालत नाही. मोटारीचे बटन अन् ट्रान्स्फॉर्मर असे हेलपाटे मारत सकाळ होते. दिवसाचे चित्र यापेक्षा वेगळे नाही.

सोलापूर : मध्यरात्री म्हणजे रात्री साडेबारा वाजता येणारी वीज काही मिनिटेही चालत नाही. मोटारीचे बटन अन् ट्रान्स्फॉर्मर असे हेलपाटे मारत सकाळ होते. दिवसाचे चित्र यापेक्षा वेगळे नाही. विहिरीत पाणी असूनही सर्वच पिके उभ्या-उभ्याच माना टाकू लागल्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी हताश झाला आहे. कोणीच विचारणा करीत नसल्याने उत्तर सोलापूर तालुक्यात वीज मंडळाच्या कारभारात सुधारणा होत नाही. अधिकार्‍यांपासून कर्मचार्‍यांपर्यंत टोपली टाकण्याचे काम सुरू आहे. याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. यामुळेच कौठाळी, कळमण, साखरेवाडी,पडसाळी, रानमसले, बीबीदारफळ, अकोलेकाटी व इतर गावांतील शेतकरी वैतागले आहेत. सकाळी सव्वाआठ व रात्री साडेबारा या दोन सत्रात अकोलेकाटी उपकेंद्रातील गावांना शेतीपंपासाठी(थ्रीफेज) वीज पुरवठा सुरू केला जातो. रात्री साडेबारा वाजता येणारी वीज सकाळी सव्वाआठपर्यंत कागदोपत्री ठेवली जात असली तरी ती काही मिनिटेही सुरळीत मिळत नाही. आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार सव्वाआठ वाजेपर्यंत वीज ठेवतो असे सांगितले जात असले तरी शेतीपंपांना काही तासही वीज मिळत नाही. दिवसभराच्या कामाने कंटाळलेला शेतकरी असा झोपी जातो तोच साडेबारा वाजल्याने मोटारी सुरू करण्यासाठी उठावे लागते. मध्यरात्रीच्या वेळी अशी मोटार सुरू केली की वीज गायब झालेली असते. ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झालेला असतो . कमी दाबाने वीज पुरवठा होतो किंवा वीज गायब होत असल्याने मोटारीच सुरू होत नाहीत. अकोलेकाटी सबस्टेशनला फोन केला तर फोन उचलण्यासाठीही कोणी व्यक्ती नसते. अधिकार्‍यांना फोन करायची तर सोयच नाही. अशा अवस्थेत शेतकरी अडचणीत आला आहे. असलेल्या पाण्यावर पिके घेण्याचा प्रयत्न केला असता वीज मंडळाकडून पुरेशा दाबाने व आठ तासही वीज मिळत नसल्याने पिके उभ्या-उभ्याच करपू लागली आहेत. (प्रतिनिधी)

लाईनमन असतात कुठे

■ कार्यकारी अभियंता म्हणून ए.ए. पठाण असताना त्यांना शेतकरी रात्री-अपरात्री मोबाईल करुन वीज पुरवठय़ाच्या तक्रारी करीत असत. उपअभियंता स्वामी हेही रात्रीच्या वेळी मोबाईल केला तरी अडचण सोडवायचा प्रयत्न करीत असत. सध्या कोणीच दखल घेणारे नसल्याने गावपातळीवरचे लाईनमनही शेतकर्‍यांची दखल घेत नाहीत.

बिले भरणार्‍यांना शिक्षा

■ मागील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी गारपीटग्रस्तांच्या यादीत नावे असलेल्यांची जानेवारी ते जून या कालावधीची शेतीपंपांची दोन बिले माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याचा लाभ उत्तर तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळाला नाही. ट्रान्स्फॉर्मर जळाल्यानंतर सरसकट बिल भरले तरच नव्याने ट्रान्स्फॉर्मर दिला जातो. म्हणजे बिले भरुनही वीज काही मिळत नाही.