शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगमध्ये केलेले बेकायदा बांधकाम तातडीने हटवा अन्यथा बांधकाम परवाना रद्द करणार : मनपा आयुक्त ढाकणे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 10:58 IST

पार्किंगमध्ये केलेले बेकायदा बांधकाम तातडीने हटवून खुले न केल्यास संबंधित इमारतीचा वापर परवाना किंवा प्रसंगी बांधकाम परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिला.

ठळक मुद्देबेकायदा बांधकाम करणाºयांना नोटिसा देण्यात आल्या मनपातर्फे बेकायदा बांधकामाविरुद्ध मोहीम उघडण्यात आलीमुदतीत बांधकाम काढून न घेण्याºयांचे बेकायदा बांधकाम महापालिकेचे पथक पाडून टाकेल

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १२  : पार्किंगमध्ये केलेले बेकायदा बांधकाम तातडीने हटवून खुले न केल्यास संबंधित इमारतीचा वापर परवाना किंवा प्रसंगी बांधकाम परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिला.मनपातर्फे बेकायदा बांधकामाविरुद्ध मोहीम उघडण्यात आली आहे. प्रमुख रस्त्यांवरील इमारती तपासून पार्किंगमध्ये बेकायदा बांधकाम करणाºयांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोटिसा देण्यात आलेल्यांमध्ये प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचे दिसून येत आहे. पण नोटिसा मिळाल्यानंतरही त्यांनी स्वत:हून बेकायदा बांधकाम काढून घेतलेले नाही. मुदतीत बांधकाम काढून न घेण्याºयांचे बेकायदा बांधकाम महापालिकेचे पथक पाडून टाकेल. पाडकामासाठी आलेला खर्च व संबंधित इमारतीला बांधकाम परवाना जेव्हा देण्यात आला त्या दिवसापासून दंड आकारण्यात येईल. आतापर्यंत मनपाच्या पथकाने ज्या इमारतीत पाडकाम केले त्या इमारतींना हा नियम लागू असल्याचे आयुक्त डॉ. ढाकणे यांनी स्पष्ट केले. मनपातर्फे बेकायदा बांधकामाविरुद्ध कारवाईचे पाऊल उचलण्यात आलेले असले तरी अशी बांधकामे असणाºयांना कोणतीच भीती असल्याचे दिसत नाही. त्यामुळे यापुढील पाहणीत पार्किंगचा बेकायदा वापर ज्या इमारतीत मोठ्या प्रमाणावर झालेला आढळून येईल त्यांचा परवाना रद्द करून इमारतच पाडली जाईल असा इशारा आयुक्तांनी दिला.------------------------पार्क चौपाटीवरील अतिक्रमण तोडा- पार्क चौपाटीवरील हातगाड्यांसाठी नव्याने नियोजन करण्यात येत आहे. जागेची मर्यादा व भाडे ठरवून स्थायी सभेकडे नव्याने प्रस्ताव मंजुरीला पाठविण्यात आला आहे. तोपर्यंत येथील सर्व व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. असे असताना दररोज नव्याने गाड्या लागत आहेत. अतिक्रमण विभाग कारवाई करून गेल्यावर पुन्हा नव्या गाड्या येत आहेत. आता ज्या गाड्या लागतील त्या जेसीबीने तोडण्याचे आदेश आयुक्त डॉ. ढाकणे यांनी दिले. -----------------४५ जणांना नोटिसापार्किंग व गोदामाच्या जागेत बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी मनपातर्फे आत्तापर्यंत ४५ जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नव्याने डॉ. शिरीष वळसंगकर, प्लॉट नं. १९७, मोदी, माधुरी शिवराम पापळ, प्लॉट नं. ८, मुरारजीपेठ, अजय अन्नलदास, २३, रविवारपेठ, अनिल रापेली, रविवारपेठ, बसवराज अक्कलकोटे, संतोष अक्कलकोटे, शारदाबाई अक्कलकोटे, रविवारपेठ, विजयकुमार राचर्ला, पाच्छापेठ, शोभा गायकवाड, रेल्वे लाईन, सलीम शेख, सिद्धेश्वरपेठ, अप्पासाहेब वांगी, नंदकुमार बुºहाणपुरे यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका