शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवप्रेमींचा आविष्कार; पंढरपुरात छत्रपतींची प्रतिमा कोरली केसांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:36 IST

पंढरपुरात शिवजयंतीनिमित्त शिवजागर अन् एकच जल्लोष

ठळक मुद्दे- पंढरपूर शहर व परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी- शहरातील मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन- मिरवणूक, सामाजिक कार्यक्रमाची दिवसभर रेलचेल

पंढरपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या (बुधवारी) १९ फेब्रुवारी रोजी जयंती... जयंतीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरातील ओके हेअर ड्रेसेसचे मालक तुकाराम चव्हाण यांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा केसांमध्ये कोरून आगळ्यावेगळ्या पध्दतीने महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. त्यांच्या या कलेचे पंढरपुरातील अनेक शिवभक्तांकडून कौतुक केले जात आहे.

२००७-८ पासून अशा प्रकारची कला त्यांनी जोपासली आहे. रमेश माने आणि सुरज शेटे यांच्याकडून ही कला त्यांनी ही कला शिकून घेतली. यापूर्वी ते जनावरांवर वेगवेगळी डिझाईल काढत असत. नंतर त्यांनी माणसाच्या मस्तकावरील केसांमध्ये वेगवेगळी हेअर स्टाईल काढणे सुरू केले. यापूर्वी त्यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वर्ल्ड कप, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भारत देशाचा नकाशा यांसह अनेक प्रतिकृती केसांमध्ये आगळ्यावेगळ्या पध्दतीने साकारल्या आहेत. 

महापुरूषांनी केलेल्या कार्यांचे स्मरण लोकांनी ठेवावे व जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचे कार्य पोहोचावे यासाठी मी महापुरूषांच्या जयंती अथवा पुण्यतिथीअगोदर त्यांना वेगळ्याप्रकारे अभिवादन करीत असल्याचे तुकाराम चव्हाण यांनी सांगितले.

प्रतिमा कोरण्यासाठी दोन तास या कामासाठी दीड ते दोन तास जातात. समोर शिवाजी महाराजांची मुर्ती समोर ठेवून हे काम केले. गतवेळी तिघांच्या मस्तकावर अशा प्रकारे शिवाजी महाराज यांची प्रतिमा कोरलेली होती. यावेळी दोघांच्या डोक्यावर सदरची प्रतिमा तुकाराम चव्हाण यांनी साकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरShivjayantiशिवजयंतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज