शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतजवळील चिंचोलीकाटी परिसरात बेकायदेशीर मुरूम उपसा सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 10:54 IST

कोंडी-चिंचोली औद्योगिक वसाहतीतील रिकामी जाग्या, लगतच्या कोंडी-अकोलेकाटी-बीबीदारफळ-गुळवंची परिसरातील गायरान जमिनी तसेच याच गावातील खासगी जागेतील मुरुमाचा मोठ्या प्रमाणात उपसा करुन त्याची विक्री केली जात आहे. 

ठळक मुद्दे खासगी जागेतील मुरुमाचा मोठ्या प्रमाणात उपसा कोंडी-गुळवंची हद्दीतील शासकीय जमिनीतील मुरुमाचाही बेकायदेशीर उपसाकंपन्यासाठी मोठ्या दराने विक्री होणाºया या मुरुमाची रॉयल्टी मात्र भरली जात नाही

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २५ : कोंडी-चिंचोली औद्योगिक वसाहतीतील रिकामी जाग्या, लगतच्या कोंडी-अकोलेकाटी-बीबीदारफळ-गुळवंची परिसरातील गायरान जमिनी तसेच याच गावातील खासगी जागेतील मुरुमाचा मोठ्या प्रमाणात उपसा करुन त्याची विक्री केली जात आहे. चिंचोलीकाटी औद्योगिक वसाहतीमधील चिंचोलीकाटी, बीबीदारफळ व कोंडी गावाच्या बाजूला बरीचशी जागा रिकामी आहे. या जागेतीत मुरुमाचा उपसा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. याशिवाय कोंडी-गुळवंची हद्दीतील शासकीय जमिनीतील मुरुमाचाही बेकायदेशीर उपसा केला जातो. याशिवाय अकोलेकाटी, बीबीदारफळ, गुळवंची व कोंडी हद्दीतून खासगी शेतजमिनीतूनही मुरुमाचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात आहे. हा मुरुम औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांना विक्री केला जातो. कंपन्यासाठी मोठ्या दराने विक्री होणाºया या मुरुमाची रॉयल्टी मात्र भरली जात नाही.  कोणी तक्रार केली की त्याची दखलही घेतली जात नाही.----------------------------मंडल अधिकाºयाचा हद्दीचा वाद...उत्तर सोलापूर तालुक्यातील गावोगावचे मंडल अधिकारी व तलाठी रंगभवनमध्ये बसूनच कारभार करीत आहेत. गावाची अन् तलाठ्याची कधी-कधी ओळख होते मात्र मंडल अधिकाºयांचे तर गावाला पाय लागणे कठीणच आहे. कारभार सगळा कोतवाल किंवा खासगी व्यक्तीवरच सुरू असतो. कोणी तक्रार केली तर कारवाई करण्यापेक्षा तक्रारदाराचे नाव सांगून त्याचीच अडचण करण्याला प्राधान्य दिले जात आहे. मुरुम उपसा करणारे पैशाच्या जिवावर कोणाला घाबरतही नाहीत. मागील आठवड्यापासून कोंडी-गुळवंची हद्दीतून उपसा होणाºया मुरुमाबाबत कारवाई करताना मंडल अधिकाºयांनी हद्दीचे कारण सांगून कारवाई केलीच नाही.-----------------------वाहने सोडून दिली़़़मागील आठवड्यात चिंचोली हद्दीतून होणाºया मुरुम चोरीची तक्रार मोहोळ तहसीलदारांकडे गेल्यानंतर  मंडल अधिकारी व तलाठ्यांना कारवाई करण्यास सांगितले. मंडल अधिकारी व तलाठी ज्या ठिकाणी मुरुम उपसा सुरू होता त्या ठिकाणी आले मात्र वाहने सोडून तक्रारदाराचे नाव मुरुम चोरट्यांना सांगून निघून गेले.------------------मुरुम उचलण्यासाठी मागील काही महिन्यात मॉडर्न रोड मेकर्स यांनी हगलूर हद्दीतून पाच हजार व एन. राजशेखर रेड्डी यांनी अकोलेकाटी हद्दीतून ४०० ब्रास मुरुम उपसण्यासाठी आमचा नाहरकत दाखला घेतला आहे. अन्य कोणाचाही मागणी अर्ज आमच्याकडे आला नाही. अवैधरित्या मुरुम उचलणाºयावर कारवाई करु.- विनोद रणवरेतहसीलदार उत्तर सोलापूर  

टॅग्स :SolapurसोलापूरMIDCएमआयडीसी