माळशिरस (जि. सोलापूर) : बेकायदेशीरपणे गर्भपात करीत पुरावे नष्ट केल्याबद्दल माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील डॉ़ विजयसिंह भगत व मेडद येथील डॉ़ सुखदेव कदम यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.अकलूज येथे डॉ. तेजस आणि प्रीती गांधी यांच्या सिया हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात केले जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर अशा प्रकारे किती डॉक्टर गर्भपात करीत आहेत, याची शोधमोहीम सुरू झाली़
बेकायदेशीर गर्भपात; दोन डॉक्टरांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 04:12 IST