शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरातील सावळ्या विठ्ठलाची मूर्ती सप्तरंगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 13:03 IST

भक्तांना भुरळ; हैदराबादहून दाखल झाल्या फायबरच्या मूर्ती

ठळक मुद्देपितळी मूर्तीपेक्षा नवीन या फायबरच्या मूर्तींना भक्तांची चांगली मागणीविठ्ठलाची व विठ्ठल-रुक्मिणीची जोडी असलेल्या वेगवेगळ्या आकारातील या मूर्तीवारकरी भांडारचे भागवत बडवे यांनी साताºयाहून या मूर्ती मागविल्याचे सांगितले

राजकुमार सारोळे 

सोलापूर : तिरुपती बालाजीच्या रंगीत मूर्तींनंतर आता हैदराबादच्या कलाकारांनी सावळ्या विठुरायाला सप्तरंगाचा साज दिला आहे. पंढरपुरातील दुकानांमध्ये दाखल झालेल्या या मूर्तींचे लोभस भक्तांना खुणावतेय.

सावळ्या रूपातील विठ्ठलाच्या मूर्ती घरोघरी दिसतील. धातू किंवा संगमरवराने बनविलेल्या या मूर्ती चांगल्याच महाग आहेत. दक्षिण भारतात गेल्यावर तिरुपती बालाजीच्या मूर्ती सप्तरंगात पाहावयास मिळतात. आता याच पद्धतीने हैदराबाद येथील कलाकारांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या फायबरच्या मूर्ती सप्तरंगात आणल्या आहेत. मूळ रूप सावळे असले तरी अंगावरील कपडे व दागिन्यांना विविध रंगांचा साज दिल्याने या मूर्ती अधिकच खुलून दिसत आहेत. पंढरपुरातील दुकानांमध्ये विविध आकारात मांडलेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या या मूर्ती लागलीच नजरेत भरत आहेत. राज्यभरातून आषाढी यात्रेसाठी येणारे भाविक या मूर्तींकडे आकर्षित होताना दिसून येत आहेत. 

मूर्ती व फोटो विक्रेते धनंजय फ्रेमचे मालक प्रकाश बोडके म्हणाले की, पितळी मूर्तीपेक्षा नवीन या फायबरच्या मूर्तींना भक्तांची चांगली मागणी आहे. विठ्ठलाची व विठ्ठल-रुक्मिणीची जोडी असलेल्या वेगवेगळ्या आकारातील या मूर्ती आहेत. रंगीत मूर्ती अधिक खुलून दिसते. त्यामुळे भाविकांचे लक्ष वेधले जाते. २०० रुपयांपासून २००० पर्यंत या मूर्तींची किमत आहे. वारकरी भांडारचे भागवत बडवे यांनी साताºयाहून या मूर्ती मागविल्याचे सांगितले. पूर्वी कारमध्ये बसविण्यासाठी अशा छोट्या मूर्ती विक्रीस येत होत्या. आता भाविकांना घरी दर्शनी भागात ठेवण्यासाठी फूटभर उंचीच्या मूर्तींना पसंती आल्याने असे उत्पादन वाढले आहे. 

वारकºयांची होतेय खरेदी- आषाढी वारीसाठी दूरून आलेला वारकरी आठवण म्हणून विठ्ठलाच्या मूळ रूपातील फ्रेम किंवा मूर्ती खरेदी करतो. आम्हाला सावळ्या रूपातील विठ्ठल भावतो, अशी प्रतिक्रिया पांडुरंग पवार (परभणी) यांनी दिली. एकादशी जवळ येईल तसे पंढरपुरातील गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे यावर्षी मूर्ती विक्रीचा व्यवसाय चांगला होईल, अशी आशा व्यापाºयांना आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा