औंढा नागनाथ : येथे ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायत करण्याचा शासनाने निर्णय घेतल्यानंतर ग्रा.पं.ने बहुमताने ठराव पारित करून या निर्णयाला सहमती दिली आहे. याबाबत शनिवारी सकाळी ग्रा.पं. कार्यालयात आयोजित मासिक बैठकीत हा सहमती ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी रमेश मोरे यांनी दिली. महाराष्टÑ शासनाने तालुका स्तरावर असलेल्या ग्रामपंचायतींना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी नगरपंचायतीचा दर्जा दिला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व औंढा नागनाथ या दोन ग्रामपंचायतींचा नगरपंचायतीमध्ये समावेश होत असून, शासनाला हवी असलेली माहिती मागविण्यात येत आहे. नगरपंचायतीच्या निर्मित्तीसाठी त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीची सहमती आवश्यक असल्याने यासाठी मासिक बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीमध्ये नगरपंचायत निर्मित्तीसाठी सर्व सदस्यांनी सहमती देऊन ठराव पारित करण्यात आला आहे. यावेळी १७ पैकी १७ सदस्य उपस्थित होते, हे विशेष होय. सरपंंच वसंत मुळे, उपसरपंच माणिक पाटील, ग्रामविकास अधिकारी रमेश मोरे, ग्रा.पं.सदस्य शरद पाटील, यमुनाबाई देशमुख, जकीयोद्दीन काजी, जी.डी.मुळे, प्रभाकर जवळेकर, सिंधू सोपान पाटील, समिना बेगम कादरी, जब्बारखाँ पठाण, दिलीप ठाकूर, मनोज काळे, राधाबाई शेषराव देशमुख, मधुकर चव्हाण, संगीता मुळे, सुनीता अंभोरे, मुंजाजी या सदस्यांनी उपस्थित राहून ठरावावर सह्या केल्या आहेत. याच अनुषंगाने ३ जून रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सरपंच वसंत मुळे यांनी सांगितले. (वार्ताहर)
ट्रकने ठोकरल्याने बर्फ विक्रेता जागीच ठार
By admin | Updated: June 2, 2014 00:44 IST