शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

साेलापुरातील 'आयएएस' अधिकारी वारकऱ्यांच्या वेशात; प्रत्येकाची काळजी घेत २४ तास पालखीसोबतच

By appasaheb.patil | Updated: July 12, 2024 15:01 IST

पालखी सोहळ्यात भजन, भारूडाचा आनंद घेतला.

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : आषाढी वारीचा सोहळा बुधवार १७ जुलै २०२४ रोजी पंढरपुरात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून १५ लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात येतात. प्रत्येक भाविक, वारकऱ्यांची काळजी घेत २४ तास पालखी सोबतच दक्ष असणारे सोलापुरातील आयएएस अधिकारी सध्या वारकऱ्यांच्या वेशात दिसून येत आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे व सोलापूर ग्रामीण पाेलिस दलाचे अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी पालखी सोहळ्यात भजन, भारूडाचा आनंद घेतला. पायी चालत चालत भक्तीरसात चिंब झालेले सोलापूरचे आयएएस अधिकारी वारीत सहभागी झालेल्यांना वेळेवर सेवासुविधा देण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत.

पालखी मार्गांवर सोहळ्यातील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवासुविधाबाबत पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ, प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त डाॅ. भावार्थ देखणे यांच्याशी जिल्हाधिकारी, सीईओ, पेालिस अधीक्षकांनी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. याचवेळी पालखी मार्गांवर देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती आयएएस अधिकाऱ्यांनी पालखी प्रमुखांना दिली. शुध्द पाणी, आराेग्य सेवा, बंदोबस्त, शौचालये, राहण्याची, मुक्कामाची सोय आदी विविध सेवासुविधा वारकऱ्यांंसाठी पुरविण्यात आल्या आहेत. या सेवा वेळेवर मिळतात की नाही ? कोणाला काही अडचण तर नाही ना ? याबाबतची विचारणा आयएएस अधिकारी सातत्याने पालखी सोहळा प्रमुखांकडे करीत आहेत. कोणत्याही अडीअडचणी येऊ नये यासाठी सोलापुरातील दोन आयएएस व एक आयपीएस अधिकारी यांच्याबरोबरच त्यांची टीम अहोरात्र काम करीत आहे.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी