शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

मी कात टाकली...बदलत्या वस्तींची कहाणी; कारगिल युद्धातील शिलेदार, फौजदार अन् यशस्वी गुणवान क्रीडापटूंची कल्याण नगर वसाहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 17:24 IST

सोलापूर : मजरेवाडी ते आसरा या दरम्यान मीटरगेज आणि ब्रॉडग्रेज रेल्वे रुळांच्या मधोमध विकसित झालेली वसाहत म्हणजे कल्याण नगर. ...

ठळक मुद्देमजरेवाडी ते आसरा या दरम्यान मीटरगेज आणि ब्रॉडग्रेज रेल्वे रुळांच्या मधोमध विकसित झालेली वसाहत म्हणजे कल्याण नगर.कारगिल युद्धातील शिलेदार, पोलीस अधिकारी, हवालदार, सरकारी नोकरदार, अभियंते आणि सामाजिक कार्यकर्ते यांची वसाहत

सोलापूर : मजरेवाडी ते आसरा या दरम्यान मीटरगेज आणि ब्रॉडग्रेज रेल्वे रुळांच्या मधोमध विकसित झालेली वसाहत म्हणजे कल्याण नगर. यापूर्वी अनुचित प्रकार, मारामारी या घटनांमुळे बदनाम असलेल्या परिसराने कात टाकली आहे. कारगिल युद्धातील शिलेदार, पोलीस अधिकारी, हवालदार, सरकारी नोकरदार, अभियंते आणि सामाजिक कार्यकर्ते यांची वसाहत म्हणून कल्याण नगर आज नावारुपाला आली आहे. 

कल्याण नगरचे एकूण तीन भाग आहेत. मजरेवाडी लगत वसलेल्या भागाला कल्याण नगर एक म्हणून ओळखले जाते. शिवशाही, चेतन फौंड्री, सिद्धेश्वर साखर कारखाना येथील कामगार १९८३ च्या सुमाराला या भागात राहायला आले. त्यानंतर १९८६-८७ च्या दरम्यान कामगारांसोबतच काही शासकीय नोकरदार आले आणि कल्याण नगर दोन व तीन तयार झाले. १९९५ च्या दरम्यान कल्याण नगर तीनमध्ये काही अनुचित प्रकार घडले आणि शहरातील लोकांनी या वसाहतींकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली.

या ओळखीमुळे कल्याण नगरमधील कष्टकरी माणसांचे नुकसान झाले. पण याच कुटुंबातील तरुण-तरुणींनी आमच्या भागाची ओळख बदलून टाकली, असे कल्याण नगर संघर्ष समितीचे प्रमुख शाम कदम आवर्जून सांगतात. कल्याण नगरमध्ये आता विविध प्रकारचे उत्सव साजरे होतात. येथील दत्त मंदिर प्रसिद्ध असून जुळे सोलापूर परिसरातील लोक दर्शनासाठी गर्दी करतात. या भागात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, बसव जयंती, शिवजयंती, अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव होतो. कल्याण नगर दोनमध्ये एक चर्च आहे.  ग्रामदैवत सिद्धेश्वरांच्या मानाच्या नंदीध्वजांचे आगमन होते. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांचे केंद्र म्हणूनही कल्याण नगरची ओळख आहे.

महिला पोलीस नाईक शांताबार्इंचा दरारा- नव्वदच्या दशकात शहर पोलीस दलातील कर्मचाºयांमध्ये कल्याण नगरमधील पोलीस नाईक शांताबाई माणिकराव सुरवसे यांचा दरारा होता. जुळे सोलापुरातील लोकही त्यांना घाबरायचे.भारतीय लष्करातून निवृत्त झालेले जगन्नाथ इंगळे, चंद्रकांत भांजे, तुकाराम माळगे, देविदास करले, शिवाजी डिंगणे, मदने, हिरेमठ, तानाजी गुळीक यांच्यासह अनेक फौजी येथे राहायला आहेत. भांजे, इंगळे यांच्यासह इतर जण कारगिलच्या युद्धात सहभागी होते. भांजे यांनी काहीकाळ पोलीस दलातही सेवा बजावली. सध्या राजकुमार हब्बू, महेश शेजेराव यांच्यासह १० ते १२ लोक पोलीस दलात कार्यरत आहेत. विनायक बिंदगे सध्या एसआरपीएफमध्ये कार्यरत आहेत. 

कष्टकरी वर्गाचे क्रीडा,उद्योगक्षेत्रातही नाव - कल्याण नगरमध्ये कलावती दुधनीकर यांच्यासारख्या अनेक कष्टकरी महिलांची संघर्षकथा ऐकायला मिळते. कलावती बार्इंनी मोलमजुरी करून आपल्या मुलींना शिकविले. त्यांची एक कन्या सारिका भरले या सहायक विक्रीकर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. येथील मुले आता क्रीडा क्षेत्रातही नाव कमवित आहेत. नुकत्याच झालेल्या सोलापूर मॅरेथॉनमध्ये कल्याण नगरमधील आदित्य दीपक निर्गुण याने १० किमी अंतराच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तनिषा अशोक हब्बू ही फुटबॉलपटू असून तिचा राज्य संघात सहभाग आहे. येथील सिद्धाराम राठोड हे दुबईमध्ये एक गॅरेज चालवितात तर रसूल नदाफ हे परदेशात अभियंता म्हणून कार्यरत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरLokmatलोकमत