शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सोलापुरच्या मीना बाजारात हैदराबादी ड्रायफ्रूट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 15:10 IST

रमजान ईद विशेष; दर गतवर्षी इतकेच; मात्र विलायची महागली

ठळक मुद्देपवित्र रमजान महिन्यात सर्वाधिक मागणी असलेली ड्रायफ्रूटची दुकाने आजपासून थाटायला सुरूवात झालीबाजारपेठेत हैदराबाद येथील ड्रायफ्रूट दाखल झाले आहेत. विलायची वगळता इतर पदार्थांचे दर हे मागील वर्षाच्या तुलनेत स्थिर

सोलापूर : पवित्र रमजान महिन्यात सर्वाधिक मागणी असलेली ड्रायफ्रूटची दुकाने आजपासून थाटायला सुरूवात झाली आहे़ येथील बाजारपेठेत हैदराबाद येथील ड्रायफ्रूट दाखल झाले आहेत. विलायची वगळता इतर पदार्थांचे दर हे मागील वर्षाच्या तुलनेत स्थिर आहेत.

जूनच्या पहिल्या आठवड्यात रमजान ईद साजरी होत आहे़ ईदनिमित्त घरोघरी शिरखुर्मा केला जातो़ यासाठी दूध, ड्रायफ्रूट वापरले जातात तसेच उपवासाच्या इतर पदार्थांसाठी लागणारा गरम मसालाही येथील बाजारपेठेत दाखल झाला आहे़ हैदराबादमधील बेगम बझार येथून सारे ड्रायफ्रूट येथील बाजारपेठेत दाखल झाले आहेत़ शहरातील बहुतांश व्यापारी रमजाननिमित्त अनेक वर्षांपासून हे साहित्य बेगम बझार येथून मागवितात़ मागील २० ते ३० वर्षांपासून या वस्तू हैदराबादमधून येतात.

ड्रायफ्रूटचे व गरम मसाल्यांचे किलोमध्ये दर 

  • - काजू - ९०० रु़
  • - बदाम - ८०० रु़
  • - मनुके - ३०० रु़
  • - चारोळी - ९०० रु़
  • - आक्रोड - ९०० रु ़
  • - पिस्ता - ११०० रु ़
  • - खजूर - २०० रु़
  • - शेवई - ७० रु़
  • - खोबरे - २२० रु़
  • - तीळ - १६० रु़
  • - धने - १०० रु़
  • - दालचिनी - ३०० रु़
  • - लवंग - ६५० रु़
  • - शहाजिरे - ६०० रु़
  • - काळीमिरे - ६०० रु़
  • - सूंठ - ३०० रु़
  • - खसखस - ६५०० रु़
  • - जिरे - २०० रु़
  • - मोहरी - ७० रु़
  • - हळकुंड १२० रु 

विलायचीचा दर भडकला- यंदा प्रथमच विलायचीचा दर भडकलेला आहे. मागील वर्षी विलायचीचा दर हा २२०० ते २५०० रुपये होता. यंदा हा दर चक्क ३५०० रुपयांवर पोहोचला आहे़ हैदराबाद आणि पुणे शहरातून हा माल येतो़ त्या ठिकाणी पाण्याअभावी याचे उत्पादन यंदा कमी असल्याने दरवाढ झाल्याचे व्यंकटेश कोळा या ड्रायफ्रूट विक्रेत्याने सांगितले़ या विलायचीमध्येही चार प्रकार पाहायला मिळतात़ 

यंदा प्रथमच विलायचीचा वाढलेला दर अनुभवतोय़ बाजारपेठेत याचा तुटवडाही आहे़ आजपासून सर्व साहित्याच्या खरेदीला सुरूवात होत आहे़ शहरात जवळपास ५० हून अधिक व्यापाºयांनी ड्रायफ्रूटची दुकाने थाटली आहेत़ - व्यंकटेश कोळा, ड्रायफ्रूट व्यावसायिक

टॅग्स :SolapurसोलापूरRamzan Eidरमजान ईदMarketबाजारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती