शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील या गावात होतेय दररोज शेकडो पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:24 IST

रंगीबेरंगी वनस्पतींच्या हिरवाईने नटलेले डोंगऱ़़ नागमोड्या वाटा़़़ खळाळणारे पाण्यांनी वेधले लक्ष

ठळक मुद्देदुष्काळी शिक्का असलेल्या भांब गावात पर्यटकांना होतेय कोकणाची आठवणखळाळणारे पाणी अन् हिरवाईने नटले डोंगर : श्रावण मासापासून पर्यटकांची गर्दीशिखर शिंगणापूर डोंगर रांगेच्या पायथ्याला आणि सोलापूर, सातारा जिल्ह्याच्या सीमेवर भांब गाव वसलेले आहे़

माळशिरस : रंगीबेरंगी वनस्पतींच्या हिरवाईने नटलेले डोंगऱ़़ नागमोड्या वाटा़़़ खळाळणारे पाणी़़़ झाडाझुडपांनी वेढलेला परिसऱ़़ असे विहंगम दृश्य डोळ्यांसमोर आले की कोकणाची आठवण येते़ आता दुष्काळी भांब (ता़ माळशिरस) परिसरातही सततच्या पावसामुळे येथे येणाºया पर्यटकांनाही कोकणची आठवण होताना दिसत आहे.

भांब येथील संभाजी बाबा दरा सध्या अनेक दिवस रेंगाळलेल्या पावसामुळे पर्यटकांना भुरळ घालत आहे. दुष्काळी पट्ट्यातील दुर्गम समजल्या जाणाºया या गावात रस्ते, पाणी, बेरोजगारी, स्थलांतर अशा अनेक अडचणी होत्या़ मात्र यावर्षी निसर्गाने गावचा परिसर बदलवून टाकला आहे. त्यामुळे ट्रेकिंग, देवदर्शन, भ्रमंती करणारी मंडळी या दराकडे आकर्षित होताना दिसत आहेत.

शिखर शिंगणापूर डोंगर रांगेच्या पायथ्याला आणि सोलापूर, सातारा जिल्ह्याच्या सीमेवर भांब गाव वसलेले आहे़ या गावाजवळील दरीत शंभू महादेव, संभाजी बाबांचे मंदिर व पुढे डोंगरातून वाट काढत दोन किलोमीटर अंतरावर असलेले वाघजाई देवीचे मंदिर हे पर्यटकांना आकर्षित करीत आहे. या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही़ पुढे वाघजाई देवी दर्शनाला दºयातून पायवाटेने प्रवास करावा लागतो़ 

तिन्ही बाजूंनी डोंगर अन्  एकाच रस्त्याने मार्गया ठिकाणाचे भौगोलिक वैशिष्ट्य असे की, या गावच्या तिन्ही बाजूंना भलेमोठी डोंगरं आहेत़ केवळ एकाच बाजूला रस्ता आहे़ या ठिकाणी पुरातन बांधकामाचे काही अवशेष मिळून येतात. मराठा सरदार संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांची छावणी या ठिकाणी होती, असे सांगितले जाते़ त्यानंतर पुढे शंकराचे भक्त संभाजी बाबा याच ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांच्या भक्तीमुळे शंभू महादेवाचे याठिकाणी शिवलिंग आहे. जुन्या पद्धतीच्या शिव मंदिराबरोबरच बाजूला पाण्यासाठी बांधलेली बारव नजरेस पडते. हे निसर्गरम्य ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते़ 

डोंगरपायथ्याच्या गावांवर दुष्काळाची छाया असते़ गेल्या अनेक वर्षांपासून पाऊस नव्हता़ त्यामुळे या भागातील निसर्ग सौंदर्य खुलले नव्हते़ ग्रामस्थांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या़ यंदा पाऊस झाल्यामुळे निसर्गाची विविध रूपे पाहायला मिळत आहेत.- शंकर पाटील, पोलीस पाटील, भांब 

टॅग्स :Solapurसोलापूरtourismपर्यटनmalshiras-acमाळशिरस