शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कारचालकाने पळवली पावणे अकरा लाखांची रोकड

By admin | Updated: October 24, 2016 15:01 IST

वसुलीसाठी पुण्याहून सोलापुरात आलेल्या मालकाची कारमधील १0 लाख ४६ हजार २00 रुपयांची रोकड असलेली बॅग कारचालकाने पळवून नेली.

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २४ -  वसुलीसाठी पुण्याहून सोलापुरात आलेल्या मालकाची कारमधील १0 लाख ४६ हजार २00 रुपयांची रोकड असलेली बॅग कारचालकाने पळवून नेण्याचा प्रकार घडला. सराफ कट्टा ते बलिदान चौक परिसरात ही घटना घडली. जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी रविवारी पहाटे कारचालक महेंद्रसिंग रामसिंग यादव (कृषीवरवार मंडळ, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे, मूळ गाव ललितपूर, उत्तप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एम. एच. १४ ई.टी. २८८९ या कारमधून फिर्यादी संदीप भोगीलाल शहा (वय ४४, रा. ८0१, वसंतवासू जोदराडे बिल्डिंग, महर्षीनगर, पुणे) हे वसुलीच्या निमित्ताने सोलापुरात आले होते. महेंद्रसिंग हा त्यांच्या कारचा चालक सोबत होता. संदीप हे सराफ बाजाराकडे आले होते. कार सराफ कट्टा ते बलिदान चौक या परिसरात पार्क केली. कारमध्ये वसुली केलेली १0 लाख ४६ हजार २00 रुपयांची रोकड होती. त्यावर लक्ष ठेवण्यास सांगून ते वसुलीसाठी आष्टगी यांच्या दुकानात गेले. या काळात चालकाला एवढी मोठी रोकड पाहून मोह झाला आणि त्याने मालकाला सराफ कट्टय़ातच ठेवून पोबारा केला. बराच वेळ झाला तरी चालक न आल्याने शहा यांनी जोडभावीपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली आहे. आरोपीविरुद्ध भा. दं. वि. ४0८ अन्वये गुन्हा नोंदला असून, तपास सपोनि बनसोडे करीत आहेत