शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

हॉटेल, लॉजचालकांनी ग्राहकांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक, सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 15:30 IST

सोलापूर : हॉटेल, लॉजचालकांनी सुरक्षेसाठी ग्राहकांच्या नोंदी ठेवण्याबरोबरच हॉटेल, लॉजमधील स्वागत कक्ष, पार्किंग विभाग आदी महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक असून त्यानुसार कार्यवाही न केल्यास चालक, मालकांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश शहर पोलीसांनी दिले आहेत़दहशतवाद, नक्षलवाद, अनैतिक मानवी व्यापार तसेच अवैध धंद्यासंदर्भात घ्यावयाच्या दक्षता व जागरूकतेबाबत हॉटेल, ...

ठळक मुद्दे- पर्यटकांचे ओळखपत्र घेऊन नोंदी कराव्यात़अनैतिक व्यापार, देहविक्री व्यवसाय आढळून आल्यास चालक, मालकांवर कारवाई स्वागत कक्षात व पार्किंग विभगाात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक

सोलापूर : हॉटेल, लॉजचालकांनी सुरक्षेसाठी ग्राहकांच्या नोंदी ठेवण्याबरोबरच हॉटेल, लॉजमधील स्वागत कक्ष, पार्किंग विभाग आदी महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक असून त्यानुसार कार्यवाही न केल्यास चालक, मालकांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश शहर पोलीसांनी दिले आहेत़

दहशतवाद, नक्षलवाद, अनैतिक मानवी व्यापार तसेच अवैध धंद्यासंदर्भात घ्यावयाच्या दक्षता व जागरूकतेबाबत हॉटेल, चालक, मालकांची शहर आयुक्तालयात बैठक घेण्यात आली़ यावेळी सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले़ दहशतवाद, नक्षलवाद, अनैतिक मानवी व्यापार, अवैध धंद्यासंदर्भात घ्यावयाच्या दक्षता व जागरूकतेबाबत सुचना देण्यात आल्या़ 

दरम्यान, सर्व हॉटेल, लॉज, गेस्ट हाउस चालकांनी स्वागत कक्षात व पार्किंग विभगाात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे़ तसेच परकीय नागरिक तसेच परराज्यातील ग्राहक आपल्याकडे राहत असेल तर त्यांची माहिती दहशतविरोधी पथक, संबंधित पोलीस ठाण्याला कळविणे बंधनकारक आहे़ अनैतिक व्यापार, देहविक्री व्यवसाय आढळून आल्यास चालक, मालकांवर कारवाई करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले़ 

याशिवाय या दिल्या अधिकच्या सुचना- स्वागतकक्षात दर्शनी भागात संबंधित पोलीस ठाणे, पोलीस नियंत्रण कक्ष, दहशतविरोधी पथकाचा संपर्क क्रमांक फलकावर लावण्यात यावा़- कोणत्याही ग्राहकाला वाहन रस्त्यांवर पार्किंग करू नये़- वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दखता घ्यावी़- संबंधित हॉटेल, लॉज मधील कामगारांचे पोलीसांकडून चारित्र्य पडताळणी आवश्यक़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसhotelहॉटेलcctvसीसीटीव्ही