शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुढी पाडवा... साच्यातील गरम पाकाचे साखरहार; सोलापुरी गोडी जाते महाराष्ट्र सीमापार

By काशिनाथ वाघमारे | Updated: March 11, 2023 16:48 IST

कच्चा माल, मजुरीत वाढ : पंढरपूर, करमाळ्यातून आले कारागीर

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्याला लागणाऱ्या साखरहारांची चाहूल सण-उत्सवप्रेमींना लागली आहे. पंढरपूर अन् करमाळ्यातून आलेले कारागीर गिरणगावात दाखल झाले असून, शहरातील मध्यवर्ती भागात शुक्रवार पेठेतील कारखान्यांमध्ये साखरहार बनवण्याच्या कामाला गती आली आहे. यंदाही सोलापूरच्या साखरहारांना पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह कर्नाटक राज्यातूनही मागणी आहे.

दर महाशिवरात्रीनंतर आठ दिवसांनी साखरहार बनवण्याच्या कामाला सुरुवात होते. यंदाही या कामाला सुरुवात झाली आहे. होळीपूर्वी हे साखरहार सोलापुरातून कर्नाटकात दाखल होतात; तर रंगपंचमीनंतर मराठवाडा आणि सोलापूर शहरातील विक्रेत्यांकडे विक्रीला येतात.

शहरात आहेत १२ भट्ट्या अन शंभर मजूर, कारागीरजोखमीच्या साखरहाराचे काम भट्ट्यांवर चालते. सोलापूर शहरात शुक्रवार पेठ आणि शेळगी परिसरात जवळपास १२ भट्ट्या चालताहेत. या भट्ट्यांवर कारागिरांसह जवळपास शंभर कामगारांचे हात साखरेत राबताहेत.दररोज ५०० किलो साखरहारशहरातील प्रत्येक भट्टीत दररोज जवळपास ५०० किलो साखरहार तयार होतात. सागवानी लाकडाच्या एका साच्यात एका वेळी आठ साखरहार तयार होतात. २० मिनिटांत हा हार तयार होतो. गरम साखरेच्या पाकात काही प्रमाणात लिंबूचा रस मिसळून त्याची चाचणी केली जाते. नंतर तो साच्यात ओतला जातो. त्यानंतर त्यात लांब दोरे टाकतात आणि साचा थंड झाला की ते उघडून हार वाळवायला लटकवतात.---मागील वर्षी साखरेचा दर ३३०० रुपये क्विंटल होता. यंदा तो ३५०० रुपयांवर पोहोचला आहे. कामगारांची मजुरीही २० टक्क्यांनी वाढली आहे. पूर्वी शंभर किलो साखरहार बनवायला आठ हजार मजुरी होती. आता दहा हजार रुपये मजुरी द्यावी लागत आहे. खूप अडचणीतून साखरभट्ट्या चालू आहेत. हा व्यवसाय कमी होतो आहे. यंदा मागणीदेखील कमी आहे.- बंडू सिद्धेसाखरहार व्यवसायिक

टॅग्स :Solapurसोलापूरgudhi padwaगुढीपाडवा