मोहन मस्कर-पाटील - सातारा -‘पार्टनर्स इन डेव्हलपमेंट’ असे ब्रीदवाक्य असलेला पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग आता ‘किलर हायवे’ बनला आहे. गेल्या काही दिवसांतील घटना लक्षात घेता या महामार्गावर झालेल्या विविध अपघातांत दीडशेहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. विशेष म्हणजे कंटेनर कोसळून झालेल्या अपघातात पन्नासहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे-बंगळूर महामार्गावर २0१३ मध्ये झालेल्या अपघातात १४३ लोकांना प्राण गमवावे लागले तर ८२१ जखमी झाले. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर वाहनांचा वेगही जीवघेणा झाला आहे. बहुतांशी अपघात हे सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे झाले आहेत, ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. महामार्गावरुन सुसाटपणे धावणारी वाहने इतरांच्या अंगावर शहारे आणतात. त्यातच एखाद्या पादचाऱ्याला अथवा वाहनांना ठोकरल्यानंतर ही वाहने तेथे तत्काळ न थांबता पुढे निघून जात आहेत. परिणामी अनेकदा मदत न मिळाल्यामुळे अनेकांचे प्राण जात आहेत. महामार्गावरील वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, अजंठा चौक, लिंब खिंड सातारकरांसाठी प्रवास करताना अतिशय धोकादायक बनली आहेत. गेल्या दहा वर्षांत या ठिकाणी पन्नासहून अधिक सातारकरांनी आपला जीव गमावला आहे. एवढे होऊनदेखील या मार्गावरील सुविधांच्या अनुषंगाने दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये नीरा नदीवर असणाऱ्या दोन पुलांमधील अंतर लक्षात न आल्यामुणे एक चारचाकी नदीत पडली होती. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता. अशा कितीतरी घटना आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे२0१४मधील प्रमुख अपघात१३ जानेवारी : खंबाटकी घाटाजवळ क्रुझरवर कंटेनर कोसळून नऊ जण चिरडून जागीच ठार, तीन जखमी.३ फ्रेब्रुवारी : खंबाटकी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघातात प्रवासी बस पुलावरून खाली कोसळून दहा ठार तर ४0 जखमी.२ मार्च : वहागावजवळ महिलेसह तिच्या तीन मुलांना वाहनाने चिरडले.३ मार्च : अतित येथील विचित्र अपघातात ४ ठार, १८ जखमी.१६ मार्च : महमार्गावर सहा ठिकाणी झालेल्या अपघातात ११ ठार.१३ जून : देवदर्शनाला निघालेली पिकअप व्हॅन ट्रकवर आदळल्याने आठ जागीच ठार.५ नोव्हेंबर : लिंबखिंड येथे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू. १६ नोव्हेंबर : पारगाव येथे एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर कंटेनर पडल्याने ८ ठार.१६ नोव्हेंबर : काशीळ येथे विचित्र अपघातात १ ठार‘एस कॉर्नर’ बनला जीवघेणा...पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असणारा ‘एस कॉर्नर’ जीवघेणा बनला आहे. याची निर्मितीच नियमबाह्य असल्याचे रस्तेबांधणी उद्योगक्षेत्रांतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या एका कॉर्नरवरच आत्तापर्यंत चाळीसहून अधिक लोकांचा प्राण केला आहे. परिणामी खंडाळा येथील तत्कालीन पोलीस निरीक्षक शेखर जाधव यांनी रिलायन्स आणि ‘न्हाय’च्या विरोधात याचिका दाखल केली आहे.२0१३ मधील अपघाताची आकडेवारीविभाग / जिल्हाअपघातजखमीमृतपुणे ग्रामीण२१७७१६00८४९सोलापूर ग्रामीण११५३१२१0५१४कोल्हापूर५६४0१४५९३१२सांगली८३२९७१३२४सातारा६५९८२११४३एकूण१0४६१६0६१२१४२