शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत २८५ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 11:39 IST

राज्यात सोलापूर प्रथम;  २६१४ बालकांवर झाले यशस्वी उपचार

ठळक मुद्देराष्ट्रीय शालेय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये ५२ टीमने काम केलेराज्यामधील किशोरवयीन मुलांच्या हृदयाचे आरोग्य बिघडत जात आहेसहा वर्षांच्या आतील बालकांमध्ये देखील हा आजार असल्याचे सर्वेक्षणात पाहायला मिळाले

सोलापूर : राष्ट्रीय शालेय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांमध्ये वाढत असलेल्या हृदयआजारासंबंधी तपासणी करण्यात आली. गरजेच्या बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या कार्यक्रमात राज्यातून सोलापूर जिल्हा प्रथम आला. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या माध्यमातून हा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला.

राज्यामधील किशोरवयीन मुलांच्या हृदयाचे आरोग्य बिघडत जात आहे. सहा वर्षांच्या आतील बालकांमध्ये देखील हा आजार असल्याचे सर्वेक्षणात पाहायला मिळाले. सार्वजनिक आरोग्य विभागाने याची दखल घेत अशा बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या वर्षात राज्यात तीन हजार ४९४ बालक ांना हृदयविकार असल्याचे निष्पन्न झाले. यातील दोन हजार ६१४ बालकांवर शस्त्रक्रि या करण्यात आल्या.

या कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया करण्यात सोलापूर जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. सोलापूरनंतर पुणे (२७०), नाशिक (२३९), अहमदनगर (१७६), नांदेड (१५५), पालघर (१३४), ठाणे (१३०), बीड (१२८), सातारा (१२०), उस्मानाबाद (११२), रत्नागिरी (१०५). प्रत्यक्षात ३४९४ बालकांवर उपचार करणे गरजेचे असताना प्रत्यक्षात २६१४ बालक ांवर उपचार करण्यात आले. उर्वरित ८८० बालकांच्या पालकांनी शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली नाही. तसेच काही बालकांच्या पालक ांनी स्थलांतर केल्याने त्यांच्यावर उपचार करणे शक्य झाले नाही.

५२ टीमकडून अंगणवाडी, शाळांची तपासणी- राष्ट्रीय शालेय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये ५२ टीमने काम केले. यात एक पुरुष व एक महिला वैद्यकीय अधिकारी, एक फार्मासिस्ट यांचा समावेश होता. जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा परिषदेकडून यासाठी सहकार्य करण्यात आले. या तीन जणांच्या टीमने जिल्ह्यातील अंगणवाडी व शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी केली. हृदयविकार असणाºया मुलांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. शासनाने करार केलेल्या पुणे व मुंबई येथील खासगी व अद्ययावत रुग्णालयात या बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सध्या या बालकांचे आरोग्य चांगले असल्याचे राष्ट्रीय शालेय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा पर्यवेक्षक भगवान भुसारी यांनी सांगितले.

या कार्यक्रमांतर्गत काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांना काम करण्याबाबत विश्वास दिला. त्यांनी समुपदेशन करत पालकांच्या मनातील भीती काढली. तसेच खासगी रुग्णालयात येणारा खर्च व सरकारी रुग्णालयामार्फत मोफत होणारे उपचार याविषयी माहिती सांगितली. यासाठी सीईओ प्रकाश वायचळ यांचे सहकार्य लाभले.- डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्य