शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महानगरपालिकेकडून होतोय नागरिकांच्या आरोग्याचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 17:31 IST

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामू पवार यांचा आरोप : सोलापूर शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे सफाई कर्मचारी असल्याने स्वच्छतेचा बोजवारा

ठळक मुद्देराज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामू पवार यांची सोलापूर महापालिकेला भेटसोलापूर शहराच्या लोकसंख्येचा विचार करता आणखी साडेचार हजार सफाई कर्मचाºयांची गरजआयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडून सफाई कर्मचाºयांबाबत माहिती घेतली

सोलापूर : शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे सफाई कर्मचारी असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या प्रश्नांचे गांभीर्य कोणालाच दिसत नाही. शहराची स्वच्छता ठेवणाºया सफाई कर्मचाºयांची संख्या वाढविणे व त्यांना सुविधा देण्याकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोप राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामू पवार यांनी मंगळवारी येथे बोलताना केला. राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामू पवार यांनी मंगळवारी महापालिकेला भेट देऊन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडून सफाई कर्मचाºयांबाबत माहिती घेतली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सफाई कर्मचाºयांबाबत महापालिकेकडून होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले.

सोलापूर महानगरपालिकेत सफाई कर्मचाºयांची ४४४ पदे मंजूर आहेत. शासनाने १९६१ मध्ये सफाई कर्मचाºयांचे निकष ठरविलेले आहेत. दर एक हजार नागरिकांमागे ५ सफाई कामगार असावेत, असा अध्यादेश आहे. असे असताना साडेदहा लाख लोकसंख्या असलेल्या सोलापूर शहराची स्वच्छता कशी होते, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. शहर वेळेवर स्वच्छ न केल्याने रोगराई वाढते. याचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसतो. ही बाब अधिकाºयांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सोलापूर शहराच्या लोकसंख्येचा विचार करता आणखी साडेचार हजार सफाई कर्मचाºयांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

लाड कमिटीच्या शिफारसीनुसार कर्मचाºयांना लाभ दिला असल्याचे अधिकाºयांनी सांगितले आहे. पण शासनाने १९९८ ला मंजूर केलेला १५ रु. घाणभत्ता सोलापूर मनपाने अद्यापपर्यंत दिला नसल्याचे अध्यक्ष रामू पवार यांनी निदर्शनाला आणले. शेगाव नगरपालिका २०० रुपये तर इतर नगरपालिका ६० ते १०० रुपये हा भत्ता देतात. पण सोलापूर मनपाच्या अधिकाºयांना शासनाच्या अध्यादेशाबाबत माहिती नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या तीन वर्षांपासून मनपाने सफाई कर्मचाºयांना साहित्य व गणवेश पुरविलेले नाही, ही बाब गंभीर आहे. सफाई कर्मचाºयांची वसाहत जीर्ण झाली आहे.

२०२ कर्मचाºयांना घरे नाहीत. आता नव्याने केवळ ७८ कर्मचाºयांसाठी निवासस्थान बांधले आहे व एप्रिलमध्ये ताबा देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सफाई कर्मचाºयांना त्यांच्या शिक्षणानुसार पदोन्नती व पागे समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे निदर्शनाला आणले. मनपाच्या बजेटमधील ०.५ टक्के म्हणजे दरवर्षी सुमारे ९ कोटी रुपये मागासवर्गीय कर्मचाºयांच्या कल्याणासाठी म्हणजेच त्यांच्या वसाहतीत अभ्यासिका, समाजमंदिर, स्वच्छतागृह बांधण्यासाठी खर्चले पाहिजेत. पण अद्यापपर्यंत अशी तरतूद करून एक रुपया खर्ची टाकलेला दिसत नाही. त्यांच्यासोबत नरोत्तम चव्हाण, अ‍ॅड. कबीर बिलाल, भूषण हंडोरे, नागनाथ गदवालकर, बाली मंडेपू, श्रीनिवास रामगल उपस्थित होते.

उदासीन धोरणाबाबत शासनाला अहवाल देणार - सफाई कर्मचाºयांच्या बाबतीत मनपाच्या उदासीन धोरणाबाबत संबंधित अधिकाºयांविरुद्ध शासनाला अहवाल देणार असल्याची माहिती राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामू पवार यांनी दिली. घाणीत काम करणाºया सफाई कर्मचाºयांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी त्यांना सुविधा देण्याबाबत शासन वेळोवेळी अध्यादेश काढत आहेत. पण त्यांना साहित्य व गणवेश न पुरविणे, पदोन्नतीकडे दुर्लक्ष करणे व इतर सुविधा देण्याकडे चालढकल केली जात आहे. शासनाच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीत कुचराई करणाºया अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद आहे. पण आतापर्यंत अशा एकाही अधिकाºयावर कारवाई झालेली नाही. तरीही मी याबाबत मनपा आयुक्तांविरुद्ध अहवाल पाठविणार असल्याचे पवार यांनी सांगितले. शासन कोणावर जबाबदारी फिक्स करायचे ते ठरवेल, असे ते म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका