शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर रेल्वेस्थानकावर उभारले हेल्थ एटीएम सेंटर; ५० रूपयांत होणार १६ प्रकारच्या चाचण्या  

By appasaheb.patil | Updated: January 16, 2020 11:44 IST

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे मुख्यालय येथेच असून सोलापूर हे भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक.

ठळक मुद्देप्रवाशांची सेवा हीच ईश्वर सेवा मानून मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने सोलापूर रेल्वे स्थानकावर हेल्थ एटीएम सेंटर सुरूसोलापूर जंक्शन हे सोलापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहेअवघ्या ५० रूपयात १६ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या रेल्वे स्थानकावर उपलब्ध

सोलापूर : प्रवासाला निघताना अस्वस्थ वाटतंय, किंवा घाईघाईत आरोग्याच्या काही तपासण्या राहून गेल्या अथवा अगदी सहज म्हणून आपल्याला आरोग्य तपासण्या करायच्या असतील तर ती सुविधा आता सोलापूर रेल्वे स्थानकावरच उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकावर हेल्थ एटीएम सुरू करण्यात येणार आहे. अवघ्या ५० रूपयात १६ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या सोलापूर रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ या एटीएमचा लाभ सोलापूरसह संपूर्ण देशभरातील कोणताही नागरिक घेऊ शकतो असेही मध्य रेल्वेच्या प्रशासनाने सांगितले.

सोलापूर जंक्शन हे सोलापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे मुख्यालय येथेच असून सोलापूर हे भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. सोलापूर रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. कुडुर्वाडी व होटगी ही जंक्शन्स जिल्ह्यात आहेत. मुंबई -चेन्नई, सोलापूर - विजापूर व मिरज - लातूर हे तीन लोहमार्ग जिल्ह्यातून गेले आहेत. कन्याकुमारी, चेन्नई, मुंबई, आग्रा, दिल्ली, हरिद्वार, भुबनेश्वर, बेंगलोर, हैदराबाद ही अनेक शहरे रेल्वेद्वारे सोलापूरला जोडली गेली आहेत. हे रेल्वेदृष्ट्या दक्षिणेचे प्रवेशद्वार आहे. या स्थानकावर दररोज हजारो प्रवाशी ये-जा करतात़ आता येणाºया प्रत्येक प्रवाशांच्या आरोग्याची काळजी रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येत आहे़ अवघ्या ५० रूपयात १६ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या होतील तपासण्या...- मध्य रेल्वेच्या सोलापूर स्थानकावर उभारण्यात आलेल्या हेल्थ एटीएम सेंटरमध्ये अवघ्या ५० रूपयात १६ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत़ हाडांचा मास, बॉडी मास इंडेक्स, बीपी, मेटाबोलिक एज, बॉडी फॅट, हायड्रेशन, पल्स रेट, उंची आदी १६ प्रकारच्या चाचण्या या हेल्थ एटीएम सेंटरवर करण्यात येणार आहेत़ ही तपासणी देशभरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार आहे़ ही सेवा खासगी एजन्सीमार्फत पुरविण्यात येत असल्याचेही रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले़ 

प्रवाशांची सेवा हीच ईश्वर सेवा मानून मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने सोलापूर रेल्वे स्थानकावर हेल्थ एटीएम सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे़ या एटीएमचे उदघाटन आज मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल याच्या हस्ते होणार आहे़ यावेळी विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र गुप्ता यांच्यासह अन्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत़ या एटीएम अंतर्गत केवळ ५० रूपयात १६ प्रकारच्या चाचण्या करण्यात येणार आहेत़ याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा़- प्रदीप हिरडे वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेHealthआरोग्यatmएटीएम