शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सलाईनच्या सुईसह तो कोरोना रूग्ण झाला गायब; अन् पुढे काय झाले ते पहा... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 11:32 IST

पंढरपूर; शौचास जाण्यासाठी म्हणून हॉस्पिटलमधून पलायन; पॉझिटिव्ह रुग्ण तीन तास रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ बसून

ठळक मुद्देकोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हॉस्पिटलमधून पळून येऊन रेल्वे स्टेशनजवळ बसला होताकाही नागरिकांनी त्याला पाहिल्यानंतर तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये जात नाहीकोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेला आहे. त्याला शोधण्याचे काम सुरु होते

पंढरपूर : खासगी हॉस्पिटलमधील अस्वच्छता व शौचालय अस्वच्छ असल्या कारणाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने हॉस्पिटलमधून सकाळी सात वाजता चड्डी व टॉवेलसह पलायन केले. हा प्रकार बुधवारी पंढरपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये घडला.

भाळवणी येथील एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एका खासगी हॉस्पिटलमध्ये तीन दिवसांपासून उपचार घेत होता. बुधवारी त्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने हॉस्पिटलमधून पलायन केले. यानंतर  हॉस्पिटलच्या प्रशासनाने शोधाशोध केली.  परंतु त्यांना रुग्ण सापडला नाही. रेल्वे स्टेशन प्रवेशद्वाराच्या कमानीजवळ तो रुग्ण जाऊन बसला होता. तीन तास एकाच ठिकाणी तो रुग्ण बसला. त्याचबरोबर त्याच्या दोन्ही हातामध्ये सलाईनसाठी लावलेली सुई तशीच होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्याला विचारले तर त्याने सांगितले की, मी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे, परंतु हॉस्पिटलमध्ये अस्वच्छता असल्याकारणाने पळून आलो आहे. मी शौचास जाऊन आलो आहे. मला निवांत बसू द्या, अशी विनंती करु लागला. त्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती.

त्या रुग्णाने रेल्वे पुलाजवळील हॉस्पिटलमधून पळून आल्याचे हात करुन सांगितले. यामुळे त्याठिकाणच्या समाजसेवकांनी गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली. त्यावेळी तेथून एक रुग्ण पळून गेला आहे. हॉस्पिटलमधील कर्मचारी त्याचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर हॉस्पिटलच्या कर्मचाºयांनी त्याला रुग्णवाहिकेमधून परत रूग्णालयात आणले. 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेला आहे. त्याला शोधण्याचे काम सुरु होते. परंतु त्याने अस्वच्छतेचे कारण सांगितले आहे. त्याला आमच्या हॉस्पिटलमध्ये अस्वच्छता वाटत असेल तर त्यांनी स्वच्छ वाटणाºया दुसºया हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावा. हॉस्पिटलचे बिल मागितले तर अशी कारणे सांगतात.- डॉ. पारस राकाखासगी हॉस्पिटल

इतर लोकांचा जीव धोक्यातकोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हॉस्पिटलमधून पळून येऊन रेल्वे स्टेशनजवळ बसला होता. यामुळे त्याच्याजवळून जाणाºया लोकांना कोरोना होण्याची शक्यता होती. काही नागरिकांनी त्याला पाहिल्यानंतर तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये जात नाही. तोपर्यंत ते नागरिक त्याठिकाणीच थांबून होते व येणाºया-जाणाºया लोकांना त्याच्यापासून दुरुन जावा, असे सांगत होते.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याPandharpurपंढरपूरhospitalहॉस्पिटल