शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

दारूला पैसे न दिल्याने माता-पित्याला मारहाण करून छप्पर पेटवून दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:16 IST

करमाळा : दारू पिण्यास पैसे देत नसल्याच्या कारणावरून मुलाने आई-वडिलांना लाथा-बुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच ...

करमाळा : दारू पिण्यास पैसे देत नसल्याच्या कारणावरून मुलाने आई-वडिलांना लाथा-बुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच घराचे छप्पर पेटवून दिले आहे.

शुक्रवारी रात्री ९.३० वाजता सालसे (ता.करमाळा) येथे घडला. याप्रकरणी दत्तू रामा अडसूळ (वय ६०, रा.सालसे, रा. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे.

दत्तू यांचा मुलगा किरण आडसूळ यास दारूचे व्यसन आहे. २५ जून रोजी रात्री तो घरी आला. मुलांना खायला का आणत नाही. दारू पिण्यासाठी पैसे का देत नाही म्हणत माता-पित्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने मारहाण करीत दगड उचलून वडिलांच्या डोक्यात मारून जखमी केले. पत्नी शालन या दत्तू यांना सोडविण्यास आल्या असता त्यांच्याही डोक्यात दगड मारून त्यांनाही जखमी केले.

---

दोन शेळ्यांचा मृत्यू

आई-वडिलांना मारहाण करून तो एवढ्यावरच थांबला नाही. त्यानंतर खिशातून काडीपेटी काढून छप्पर पेटवून दिले. यावेळी आगीत दोन शेळ्या भाजून जागीच मरण पावल्या. तसेच शेतीपयोगी सामान असे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर मुलगा किरण हा पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी किरणविरुद्ध गुन्हा दाखल केला.