गणेश चंद्रकांत गरड (ता. परांडा) असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे. पीडित महिला ही दवाखान्यातील सुनेची भेट घेऊन गावी जाण्यासाठी शहरातील शंकेश्वर बसथांब्यावर थांबली होती. त्याच वेळी ओळखीच्या दुचाकीस्वाराने येऊन बसला वेळ असल्याने गावी सोडतो, असे तो म्हणाला. तिनेही विश्वासाने गाडीवर बसली. पण त्याने परांडा रोडवरून न जाता उपळाई रोडने निघाला. त्यावेळी तिने हा रोड नाही, असे म्हटले तरीही त्याने तसेच गाडी घेऊन निघाला. काही अंतरावर गेल्यानंतर विनयभंग करण्याचा प्रयत्न सुरू केला. नको ते विचारू लागला. तेव्हा पीडित महिलेंनी चालू गाडीवरून उडी मारली, तरीही तो विनयभंग करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा आरडाओरड केल्यावर लोक आले आणि तो पळून गेला. पुढील तपास सहदेव देवकर, अभिजित गाटे, माधव धुमाळ करीत आहेत.
गावी सोडण्याचा बहाणा करून महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST