शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आठ कोटीच्या घरात राहण्याची लायकी नाही म्हणत विवाहितेचा छळ; लातूरमधील घटना

By appasaheb.patil | Updated: September 17, 2023 15:54 IST

याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल कटारे करीत आहेत.

सोलापूर : लग्नात काही एक चांगले मानपान केले नाही, सोने-चांदीचे दागिने दिले नाहीत. आमचे आठ कोटींचे घर आहे, त्यात मोठमोठ्या साहित्याची गरज आहे, ते माहेरून आणण्यासाठी विवाहित महिलेस मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून शारीरिक त्रास दिला. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात पती, सासू, सासरे, नणंद, नणंदेचे पती याच्याविरोधात १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनंदा दत्तात्रय मदने (वय ३८, रा. राजहंसनगर, शिवाजीनगर, बाळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती दत्तात्रय मदने, सासू कलावती मदने, सासरे व्यंकटराव मदने (रा. मदने निवास, दयाराम रोड, लातूर) व नणंद शीतल खताळ पाटील, नणंदेचे पती ऋषिकेश खताळ पाटील (रा. नळदुर्ग, धाराशिव, सध्या - पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनंदा मदने या सासरी नांदत असताना पती, सासू, सासरे, नणंद व नणंदेच्या पतीने फिर्यादी सुनंदा हीस लग्नात काही एक मानपान केला नाही, आम्ही पैसे खर्च केलेले आहेत, तुझ्या आई-भावांनी काही हुंडा दिला नाही, तू आमच्या घरात नांदण्याचे लायकीची नाही, आमचे आठ कोटींचे घर आहे, त्यात मोठमोठ्या साहित्याची गरज आहे, ते तुझ्या माहेरून मागून घे नाहीतर आमच्याकडे नांदण्यास येऊ नको म्हणून मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून फिर्यादीस मानसिक व शारीरिक त्रास देऊन जाचहाट केला आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल कटारे करीत आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर