शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आनंदी मनासाठी मानसिक शांती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 18:03 IST

माणसाच्या मनात सतत विचारांचा गुंता सुरू असतो. शरीर व मन यांचा समतोल राखता आला पाहिजे.

अंत:करणातील चाललेली मनाची स्थिती-गती-लय ही स्वभावातून प्रकट होते. मनापासून हसणे व वरवर हसणे यातून त्याचे प्रात्यक्षिकीकरण आढळते. माणसाचे मनच आपली चांगली किंवा वाईट विचारशैली ठरवत असते. आपले मन कधीही दृढ असावे. त्यासाठी रोज सकाळी सूर्यस्नान केले पाहिजे. आनंदी मन मानसिक शांती देते. समाधानी राहाते. समाधानी जीवन जगणे हीच खरी भक्ती किंवा उपासना ठरू शकते; पण त्यासाठी शुद्ध व सात्त्विक मनाची गरज असते. 

सात्त्विक मन विचारांना शुद्ध करते. जीवन समृद्ध बनवून त्यातील वाईट विचारांना नष्ट करते. कारण आपल्या मनात जशी भावना असते तसेच त्याचे कर्म घडते. जसे कर्म घडते तसेच त्याला फळ मिळते. ज्याचे मन शुद्ध त्याची वाणी शुद्ध, विचार पवित्र असतात. म्हणून प्रत्येकाने दैनंदिन जीवन जगताना आपल्या नेहमीच्या व्यापातून एक-दोन तास तरी संतचरित्र वाचावेत. त्यामुळे 'मन' प्रफुल्लित होईल. प्रफुल्लित झालेले मन उत्तम कार्य करण्यास प्रेरणा देते. त्या मनाला बळही मिळते. कर्तव्यनिष्ठा व परोपकार वृत्तीवाढीस लागते. ज्ञानयोग-कर्मयोग व भक्तियोग यांचा सुंदर समन्वय त्या मनाला घडतो. त्यातून मनचिंतन केल्याने जीवन प्रकाशमान होते. मन आनंदी होते.

माणसाच्या मनात सतत विचारांचा गुंता सुरू असतो. शरीर व मन यांचा समतोल राखता आला पाहिजे. कारण मन चंचल, चपळ आहे. मनाला सतत सजग ठेवले पाहिजे. ह्यमनह्ण प्रसन्न असले की अंत:करणातील भावही प्रसन्न असतात. कारण मनाचे भाव आपल्या शरीरातील हालचालीवरून ओळखता येतात.  मनाला चेतना व स्फूर्ती देणारे सकाळीचे कोवळे ऊन मनाला प्रसन्न ठेवते. त्यालाच मनाची स्थिती कायम स्थिर ठेवता येते. थोडक्यात मनावर ताबा मिळवता येतो. मन सात्त्विक बनते. सात्त्विक मन भक्तिमागार्चा अवलंब करते. मनातील वाकडेपणा दूर करण्यासाठी सात्त्विक मनाची गरज आहे.- सदगुरू नरेंद्र राऊत महाराज,सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक