शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात 'हातभट्टीमुक्त गाव' मोहीम; हॉटस्पॉट गावावर अचानक टाकणार धाडी

By appasaheb.patil | Updated: May 19, 2023 17:41 IST

दरम्यान, हातभट्टी तयार करणारे, हातभट्टी दारुचे वाहतूकदार व विक्रेते यांचेवर विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. 

सोलापूर : राज्यभरात “हातभट्टीमुक्त गाव” ही संकल्पना राबविण्याचा संकल्प केला असून त्याच अनुषंगाने सोलापुर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरातील हातभट्ट्या असलेल्या गावांची पोलीस स्टेशन निहाय यादी तयार केली आहे. विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अशा हातभट्टी हॉटस्पॉट ठिकाणांवर अचानकपणे छापे टाकून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सांगितले. 

दरम्यान, हातभट्टी तयार करणारे, हातभट्टी दारुचे वाहतूकदार व विक्रेते यांचेवर विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारुविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत असून अवैध दारु विक्री, निर्मिती, वाहतुकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागास कळवावे असे आवाहन केले आहे. 

दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारुविरोधात सोलापूर जिल्हाभरात मोहिम तीव्र केली असून १ ते १९ मे कालावधीत हातभट्टी दारु निर्मिती, विक्री व वाहतुकीचे  गुन्हे नोंदविले असून १८ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर