शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानोबा माऊलीचा गजर अन्‌ पालख्यांवर पुष्यवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षीही आषाढी वारीसाठी सर्व संतांचे पालखी सोहळे पायी न जाता राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून नेण्याचा निर्णय ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षीही आषाढी वारीसाठी सर्व संतांचे पालखी सोहळे पायी न जाता राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून नेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर देहू ते पंढरपूर आषाढी वारीसाठी जगद‌्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे देहूतून प्रस्थान झाले. आज आषाढी वारीसाठी पालखी सोहळा देहूतून एस.टी. बसने निघून वारी मार्गावरून पंढरपूरकडे निघाला.

पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील निरा नदीवरील पूल ओलांडून पालखी सोहळ्याने सायंकारी ४ वाजून ५ मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पुढे पालखी सोहळा अकलूजकडे मार्गक्रमण करीत असताना ठिकठिकाणी भाविकभक्तांनी पुष्पवृष्टी करीत ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ असा जयघोष केला. अकलूज शहरात गांधी चौक येथे अकलूजकरांनी ‘बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ अशा जयजयकारात पुष्पवृष्टी केली. यानंतर जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या बसचे दर्शन घेतले. पालखी सोहळा गांधी चौकातून जुने पोलीस ठाणे व जुन्या बसस्थानकासमोरील मार्गावरून माळीनगर, महाळुंग, बोरगाव, बोंडलेमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.

190721\1754-img-20210719-wa0032.jpg

अकलुज शहरात पुष्पवृष्ठी करीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.