शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘पर्ल्स’च्या संचालक, एजंटासह नऊजणांवर गुन्हा

By admin | Updated: December 10, 2014 23:44 IST

महाराष्ट्रातील पहिली तक्रार...

सातारा : मुदत संपलेल्या ठेवीचा परतावा न केल्याप्रकरणी ‘पर्ल्स’चे पाच संचालक, दोन एजंट आणि सातारा कार्यालयातील व्यवस्थापकासह सर्व कर्मचाऱ्यांच्या विरोधात बुधवारी रात्री उशिरा शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी पांडूरंग कृष्णाजी मोहिते (वय, ६६, रा. विसापूर, ता. खटाव) यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान, या अनुषंगाने अन्य एक तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पर्ल्सविरोधात ३.२५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे मोहिते यांनी नमूद केले आहे. मोहिते यांनी तक्रारीत म्हटले आहे की, दि. १३ आॅगस्ट २00७ रोजी दस्तगीर शेख (रा. खातगुण, ता. खटाव) आणि मारुती साळुंखे (रा. विसापूर, ता. खटाव) माझ्या घरी आले. त्यांनी पर्ल्स’ची माहिती दिली आणि यामध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. यानंतर त्यांनी कंपनीचे संचालक तरलोचन सिंग, सुखदेव सिंग, गुरमित सिंग, सुब्रता भट्टाचार्य, प्रेमजित कांडा (सर्वजण सातवा मजला, गोपाळदास भवन, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली) यांनीही माझ्याशी फोनवर संपर्क साधून चांगल्या परताव्याची हमी दिली. त्यानंतर दि. १६ आॅगस्ट २00७ रोजी शेख आणि साळुंखे पुन्हा माझ्या घरी आले.त्यांनी कंपनीची माहिती देत एकदा २0 हजार रुपये भरले की तुम्हाला दहा वर्षांत आमची कंपनी ७४,१३४ रुपये देईल, असे सांगितले. त्याप्रमाणे मोहिते यांनी प्रत्येकी २0 हजार रुपयांप्रमाणे पाच पावत्या केल्या आणि ‘पर्ल्स’मध्ये लाख रुपये गुंतवले. माझा मुलगा नवनाथ याने २0 हजार, भाचा संजय राऊत (आवी) याने १५ हजार आणि १0 हजार तर बहिण सावित्रीबाई कृष्णा खिलारे (वाठार किरोली) यांनी १५ हजार अशी रक्कम माझ्या सांगण्यानुसार शेख आणि साळुंखे या एजंटामार्फत सहा वर्ष मुदतपावती करून ठेवली. याची मुदत आॅगस्ट २0१४ मध्ये संपली आहे. आम्ही पैशाची मागणी केली असता त्याचा परतावा आम्हाला करण्यात आलेला नाही. मी सातारा कार्यालयात जावून पैसे मागितले असता नकार देण्यात आला. एजंट शेख आणि साळुंखे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. माझी याप्रकरणी फसवणूक झाली आहे. (प्रतिनिधी)महाराष्ट्रातील पहिली तक्रार...‘पर्ल्स’च्या विरोधात फसवणूकप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात दाखल झालेली महाराष्ट्रातील पहिली तक्रार आहे. ‘पर्ल्स’वर ‘एमपीआयडी अ‍ॅक्ट’प्रमाणे कारवाई करावी आणि ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्यात अशी मागणी अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, तात्या सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेले तीन दिवस झाले उपोषणास बसले आहेत.