शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

गुदमरलेलं चौक...विजापूर वेस ; शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला वर्दळीचा चौक आता बनलाय चारचाकी वाहनांचा अनधिकृत तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:07 IST

संतोष आचलारे  सोलापूर : कोणीही कोणत्या शहरातूनही यावे अन् चौकाच्या मध्येच चारचाकी वाहन पार्क करून बिनधास्त जावे, अशीच जणू ...

ठळक मुद्देसोलापूर शहरातील विजापूर वेस एक नावाजलेला चौककोणीही कोणत्या शहरातूनही यावे अन् चौकाच्या मध्येच चारचाकी वाहन पार्क करून बिनधास्तचौकाच्या मधोमधच चारचाकी वाहने पार्क करण्यात येत असल्याने या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे

संतोष आचलारे 

सोलापूर : कोणीही कोणत्या शहरातूनही यावे अन् चौकाच्या मध्येच चारचाकी वाहन पार्क करून बिनधास्त जावे, अशीच जणू अवस्था विजापूर वेस चौकाची झाली आहे. दहा ते बारा तासांपर्यंत चौकाच्या मध्येच चारचाकी वाहने कोणीही येऊन पार्क करून जात असल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. 

सोलापूर शहरातील विजापूर वेस एक नावाजलेला चौक आहे. सिध्देश्वर मंदिर, पार्क चौक, मधला मारूती, रंगभवन, जिल्हा परिषद , पूर्व भाग व भाजी मंडईकडे जाणाºया नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ या चौकात असते. सायंकाळी तर या चौकात अक्षरश: जत्रा भरल्यासारखी गर्दी असते. 

चौकाच्या मधोमधच चारचाकी वाहने पार्क करण्यात येत असल्याने या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. दुचाकीस्वार व पादचारी व्यक्तींना याचा सर्वाधिक नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झाल्याने वाहनधारकांचा संताप अनावर होत आहे. 

विजापूर वेसमधील चौकातच एका कोपºयात पोलिसांचा ताफा या ठिकाणी नेहमीच थांबलेला असतो. या ठिकाणी सीसी कॅमेरेही तैनात करण्यात आले आहेत. बेशिस्त वाहनधारकांना खाकी वर्दीतील पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या पोलिसांनाच काही उध्दट नागरिकांकडून कायदा शिकवला जात असल्याची माहिती यावेळी येथील नागरिकांनी दिली. त्यामुळे येथील खाकी वर्दीतील पोलीस कायदा व सुव्यवस्थेवर अलर्ट राहत असल्याचेही सांगण्यात आले. 

भाजी मंडईच्या परिसरात उभारलेल्या रिक्षाचालकांकडून प्रवासी खेचण्यासाठी चौकातच रिक्षा उभी करण्याचा प्रकारही येते दिसून येतो. हातावर पोट असणाºया रिक्षाचालक व चारचाकी हातगाडीवाल्यांकडून ग्राहक मिळविण्याच्या नादात काही जणांकडून अनेकदा वाहतुकीची शिस्त मोडली जातानाही दिसून येते. ग्राहक मिळाल्यानंतर मात्र पुन्हा सुरळीत वाहतुकीसाठी दक्षताही रिक्षाचालक व हातगाडीवाल्यांकडून घेताना दिसून येत होते. चौकातील वाहतुकीचे नियोजन होणे गरजेचे आहे. 

तहानलेल्यांना चौकातील पाणपोईचा आधार...- चालत दमून पायी आलेल्या नागरिकांना तहान लागल्यानंतर या ठिकाणी चौकाच्या बाजूला असलेल्या पाणपोईचा मोठा आधार निर्माण झाला आहे. डॉ. झाकीर हुसेन युवक संघटनेने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे तहानलेल्या नागरिकांच्या घशाची कोरड भागविली जात आहे. पाण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकही याठिकाणी दिसून येत होते. उन्हाळ्यात या पाणपोईचा सर्वात मोठा आधार नागरिकांना होतो. 

वाहतूक सुरळीत झाली तर भांडणे थांबतील : म.सलीम हिरोनी- विजापूर वेस म्हटलं की भांडणाचा चौक अशी ख्याती आहे. या चौकातून सर्व धर्माचे लोक जातात. बेशिस्त वाहनांच्या थांब्यामुळे या ठिकाणी सुरळीत वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यातून अनेकदा होणाºया छोट्या-मोठ्या अपघातामुळे भांडणाला वेगळे रूप देण्यात येते. हा प्रकार कोठेतरी थांबण्याची गरज आहे. येथील वाहतूक सुरळीत झाली तरच भांडणे थांबतील, असे मत येथील चहाचे व्यावसायिक म.सलीम हिरोनी यांनी व्यक्त केले. 

रस्त्यासाठी ४0 दुकाने गेली, पण रस्ता काय होत नाही : हाजी इक्बाल नानाविजापूर वेस चौकातील रस्ता चांगला व्हावा यासाठी २0 वर्षांपूर्वी येथील ४0 दुकाने पाडण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी मोठा रस्ता होईल अशी अपेक्षा होती. मात्र रस्ता काही झाला नाही. बेशिस्त वाहतुकीमुळे येथे सातत्याने संघर्ष होत आहे. वाहतूक पोलिसांकडून काही दिवस शिस्त लावण्याचा प्रयत्न होतो, मात्र पुन्हा पूर्वपरिस्थितीच येते, अशी प्रतिक्रिया येथील नागरिक हाजी इक्बाल नाना यांनी दिली. 

सायंकाळच्या वेळी जास्त कोंडी होते : मुजाहिद बागवानसण, उत्सव किंवा मिरवणुकीच्या वेळी या चौकात वाहतुकीची कोंडी होते. तासन्तास बेफिकीरपणे लावण्यात आलेल्या वाहनामुळे सायंकाळच्या वेळी वाहतुकीची सर्वाधिक कोंडी होते़ त्यामुळे अशा बेफिकीरपणे लावणाºया वाहनांना अन्य ठिकाणी पर्यायी पार्किंगची व्यवस्था झाली तर येथील वाहतुकीची कोंडी दूर होईल, असे मत येथील व्यावसायिक मुजाहिद बागवान यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Bhavanलोकमत भवन