शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

गुढीपाडवा विशेष...! जावईहारांनी नटला सोलापूरचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 12:47 IST

सोलापूरचे साखरहार मराठवाडा, कर्नाटकातही दाखल, गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठात गर्दी

ठळक मुद्देसोलापूरचे साखर हार हे मराठवाडा आणि कर्नाटकात दाखल कौटुंबिक आनंदाचा सण म्हणून पाहिला जाणारा गुढीपाडवा

सोलापूर : कौटुंबिक आनंदाचा सण म्हणून पाहिला जाणारा गुढीपाडवा रविवार, १८ मार्च रोजी साजरा होत आहे़ या पार्श्वभूमीवर मधला मारुतीसह इतर ठिकाणचा बाजार जावईहारांनी नटला आहे़ यंदाही सोलापूरचे साखर हार हे मराठवाडा आणि कर्नाटकात दाखल झाले आहेत़ दारामध्ये सकाळी गुढी उभारण्याची प्रथा महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जपली गेली आहे़ साखरेच्या हाराशिवाय सण होत नाही़ यंदा हार बनविणाºया व्यावसायिकांसमोर कुशल कारागीर, मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ महाशिवरात्रीपासून शहरात शुक्रवार पेठ आणि रूपाभवानी परिसरात कारखान्यांमध्ये साखरेचे हार बनविले जात आहेत़.

या १५ दिवसात कर्नाटकमध्ये विजापूर, गुलबर्ग्यासह विविध जिल्ह्यांमध्ये सोलापूरचे साखरेचे हार विक्रीला गेले आहेत़ तसेच आता मराठवाड्यात उस्मानाबाद, बीड, लातूरमध्ये येथील साखर हार विक्रीला गेले आहेत़ याबरोबरच साखर आणि इतर कच्च्या मालाचे दर वाढल्याने साखर हारांचे दरही काहीअंशी वाढले आहेत़ सध्या बाजारात हारांचे दर १२० रुपयांपासून आहेत़ याबरोबरच लहान मुलांना आकर्षित करणारी लहान शोभिवंत गुढी बाजारात दाखल झाली आहे़ 

बाजारात प्रथमच बदाम साखरेचा हार- यंदा बाजारात जावयांसाठी आणखी एक वेगळ्याप्रकारे हार पाहायला मिळतोय़ आजपर्यंत खारीक आणि खोबºयाचा हार मानाने दिला जातोे़ यंदा प्रथमच साखरेचा आठ फुटाचा दहा इंची पदक आणि अडीच शेराचे हार बाजारात दाखल झाले आहेत़ त्यावर बंदा रुपाया, बदाम चिकटवलेले आहेत़ तसेच आणखी आगळा-वेगळा कर्नाटकी हारही पाहायला मिळतो, तो म्हणजे विविध रंगातील बत्ताशांचा साखर हाऱ अशाप्रकारे जावयांसाठी प्रथमच तीन प्रकारचे हार पाहायला मिळत आहेत़ जावयांना घालण्यासाठी बाजारात आलेल्या हारांपैकी नव्याने आलेल्या आठ फुटी हारांची किं मत ही ११०० रुपयांपर्यंत आहे़ 

कुशल मनुष्यबळाअभावी सोलापूर शहरात साखर हार बनवण्याचे प्रमाणही कमी आहे़ यातूनही कर्नाटक आणि मराठवाड्यात हार विक्रीला दाखल झाले आहेत़ सोलापूरने आजपर्यंत जपलेल्या वैशिष्ट्यपणामुळे राज्याबाहेर साखर हार जातोय़ यंदा जावयांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे हार बनविले गेले आहेत़ - बंडू सिद्धे, विक्रेते.

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारgudhi padwaगुढी पाडवा