शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री गटाचा सोलापूर महानगरपालिका सर्वसाधारण सभेवर बहिष्कार, सभागृहाचे दरवाजे बंद करून स्थायी समिती सदस्यांची केली निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 12:29 IST

सोलापूर महापालिकेची फेबु्रवारी महिन्यातील सर्वसाधारण सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार १७ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १२ वाजता सभा झाली़

ठळक मुद्देभाजपाचे जुगुनभाई आंबेवाले, सुभाष शेजवाल, राजश्री कणके, विनायक विटकर, सेनेचे गणेश वानकर, भारत बडूरवाले, एमआयएमचे तौफिक शेख, राष्ट्रवादीचे किसन जाधव यांची स्थायी समिती सदस्य निवडप्रभारी सभागृहनेता कोण यावरून पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटात एकमत झाले नसल्याचे आजही दिसून आले़पालकमंत्री गटाच्या उपमहापौर शशिकला बत्तुल यांच्यासह सर्व सदस्यांनी बहिष्कार टाकला़

सोलापूर आॅनलाइन लोकमतसोलापूर दि १७ : सोलापूर महापालिकेची फेबु्रवारी महिन्यातील सर्वसाधारण सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार १७ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १२ वाजता सभा झाली़ या सभेत पालकमंत्री विजयकुमार देशमुख गटाचे सर्व सदस्यांनी या सभेवर बहिष्कार टाकला़ सभागृहाचे दरवाजे बंद करून शिवसेना व इतर विरोधी पक्षांच्या पाठिंब्याने महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्थायी समिती सदस्य निवडीचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला़ यात भाजपाचे जुगुनभाई आंबेवाले, सुभाष शेजवाल, राजश्री कणके, विनायक विटकर, सेनेचे गणेश वानकर, भारत बडूरवाले, एमआयएमचे तौफिक शेख, राष्ट्रवादीचे किसन जाधव यांची निवड करण्यात आली़ प्रभारी सभागृहनेता कोण यावरून पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटात एकमत झाले नसल्याचे आजही दिसून आले़ पालकमंत्री गटाच्या उपमहापौर शशिकला बत्तुल यांच्यासह सर्व सदस्यांनी बहिष्कार टाकला़ महापौर शोभा बनशेट्टी यांनी विषय पत्रिकेवरील स्थायी समिती निवडीचा एकमेव विषय घेऊन दोन दिवंगतांना श्रध्दांजली वाहून सभा तहकुब केली़ यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सभागृहनेता सुरेश पाटील यांच्यावर झालेल्या उपचार खर्चासाठी मनपातर्फे २० लाख रूपये द्यावे व त्यांच्यावर झालेल्या विषबाधा प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी असा तातडीचा प्रस्ताव मांडला़ सदस्यांना तातडीचा प्रस्ताव मांडता येतो का असा आक्षेप विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी घेतला़ चर्चेअंती महापौर शोभा बनशेट्टी यांनी हा तातडीचा प्रस्ताव दाखल करून घेतला़ सभेचे कामकाज सुरू असताना पालकमंत्री गटाचे सदस्य सभागृहनेते यांच्या कार्यालयात बसून होते़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका