शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’मुळे उद्योग, व्यापार अडचणीत, संतोष मंडलेचा यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 14:49 IST

संतोष मंडलेचा सोलापूर दौºयावर आले असता ते लोकमतच्या प्रतिनिधीशी बोलत होते.

ठळक मुद्देबँकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माणसंपूर्ण देशातील उद्योग व व्यापार अडचणीतव्यवसायासाठी लागणाºया खेळत्या भांडवलावर गदा

संताजी शिंदे सोलापूर : गेल्या दीड वर्षात नोटाबंदीची लाट अनुभवायला आली, यातून सावरत नाही तोपर्यंत वस्तू सेवा कर(जीएसटी) लागू करण्यात आला. या प्रकारामुळे राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील उद्योग व व्यापार अडचणीत आला आहे. व्यवसायासाठी लागणाºया खेळत्या भांडवलावर मोठी गदा आली असून, बँकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ‘जीएसटी’मुळे उद्योग, व्यापार अडचणीत आल्याचे मत महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅन्ड अ‍ॅग्रिकल्चरचे प्रदेशाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

संतोष मंडलेचा सोलापूर दौºयावर आले असता ते लोकमतच्या प्रतिनिधीशी बोलत होते. ते म्हणाले, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री ८ वाजता देशाला उद्देशून भाषण केले आणि त्यात अचानक ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बंद केल्याचे जाहीर केले. नोटाबंदीच्या संकटातून बाहेर पडत असताना कोणतीही पूर्वतयारी न करता केवळ अट्टाहासापोटी २०१७ मध्ये ‘जीएसटी’ लावण्यात आली. आजही नव्या सिस्टमला जीएसटी प्रणाली समरस झाली नाही. छोटे व्यापारी, उद्योजक त्रस्त झाले आहेत, निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. निर्यातदाराला पैसे द्यावे लागत असल्याने भांडवल गुंतले आहे, त्यामुळे उद्योग, व्यापार अडचणीत आला आहे, असे संतोष मंडलेचा म्हणाले. 

व्यापारी आणि उद्योजक भांडवल घेण्यासाठी बँकांकडे जातात, पण काही उदाहरणे समोर येत असल्याने बँकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. बँकांकडून भांडवल मिळत नाही. या सरकारने दुप्पट उद्दिष्ट ठेवल्यामुळे इन्कम टॅक्स वाढल्याचे सांगत आहेत. मात्र नवीन आणि नियमित करदात्यांकडून किती प्रमाणात कर प्राप्त होतो, हा संशोधनाचा विषय आहे.

आज व्यापारी आणि उद्योजक आपला व्यापार सुरळीत करू शकत नाहीत, ही स्थिती संपूर्ण भारतात आहे. सर्व शासकीय कार्यालये फक्त कर वसूल करण्याच्या कामात आहेत. मी आरबीआय इम्पॅक्ट कमिटीवर सदस्य असून, छोटे व्यापारी आणि उद्योजक यांना पतपुरवठा सुलभतेने मिळावा म्हणून पाठपुरावा करीत आहे. याबाबत ‘आरबीआय’ ला चेंबर आॅफ कॉमर्सच्या वतीने पत्र देण्यात आले आहे, असेही संतोष मंडलेचा यांनी सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसायGSTजीएसटी