शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात ‘नमो’ चा आनंदोत्सव !

By admin | Updated: May 27, 2014 00:52 IST

मोदी सरकार : भाजपची दिवाळी, मिठाई वाटप, फटाके फोडले, एलईडी वॉलवर शपथविधीचा सोहळा

सोलापूर : राष्टÑपती भवनाच्या प्रांगणात सार्क देश प्रमुखांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी पद व गोपनीयतेची शपथ घेत असताना सोलापुरातील चौका - चौकात ‘नमो नमो’चा जयघोष करून जोरदार आतषबाजी करण्यात आली. मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. टिळक चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा स्क्रिन लावून मोदी यांचा शपथविधी पाहिला. मोदी यांचे राष्टÑपती भवनाच्या प्रांगणात आगमन झाले तेव्हा कार्यकर्त्यांनी टिळक चौकात फटाक्यांची माळ उडविली. शपथविधी झाल्यानंतर जोरदार आतषबाजी करण्यात आली. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, भाजपचे नेते श्रीशैल बनशेट्टी, देविदास चेळेकर, नगरसेविका शोभा बनशेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. शपथविधी होताच मोदी सरकारची कारकीर्द यशस्वी ठरावी म्हणून हैदराबाद रोडवर विडी घरकूलमधील बी ग्रुपमध्ये गणेश मंदिरात भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली़ यावेळी नगरसेवक पांडुरंग दिड्डी, संघटन सरचिटणीस विक्रम देशमुख, श्रीनिवास दायमा, दत्तू पोसा, चंद्रकांत बल्ला आणि भाजपचे प्रमुख कार्यकर्ते विजय इप्पाकायल यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी या भागात लाडू वाटप करुन आनंदोत्सव केला़ याप्रसंगी भास्कर बल्ला, संतोष इप्पाकायल, पोशेट्टी मडूर, राजू पानगंटी, राजू वंगारी, प्रभाकर सीता, राजेंद्र कन्ना, श्रीनिवास पुरुड, स्वामीदास सिद्धूल, सतीश भरमशेट्टी, व्यंकटेश सारंगी, शिवा कोनाळे, इरेश पेद्दी, दीपक पोसा, अक्षय ताटी, गोपाळ दंडगल, अजय गड्डम, श्रीनिवास अवधूत, महादेव हबीब, शिवा मरगळ, रमेश रंगम, लक्ष्मण बलपुरे, तिरुपती दासरी, प्रसाद धारा, पवन इप्पाकायल आणि विडी घरकूलमधील नागरिक उपस्थित होते़ याशिवाय शहरात ठिकठिकाणी भाजप-सेनेच्या कार्यक़र्त्यांनी जल्लोष करुन आनंद व्यक्त केला.

----------------------------------

रुपाभवानीला अभिषेक भारतात राष्टÑीय लोकशाही आघाडी सरकार स्थापन झाल्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी रूपाभवानी मातेला अभिषेक करण्यात आला. शिवसेना संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरूरकर यांनी हा अभिषेक केला. यावेळी सुनील कामाटी, लक्ष्मीकांत ठोंगे- पाटील, भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------------------

नमो टी...

मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपप्रेमी नागरिक आणि कार्यकर्त्यांनी तरटी नाका येथे ‘नमो टी’ स्टॉल सुरू करून मोफत चहा दिला. एसटी स्टॅन्ड ते बाळीवेस या मार्गावरून मार्गस्थ असलेल्या सोलापूरकरांनी या टी स्टॉलला आवर्जून भेट देऊन चहाचा आस्वाद घेतला आणि मोदी सरकारला शुभेच्छा दिल्या.