शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गावातील आजी, माजी सैनिकांची घरपट्टी माफ, अनगर ग्रामपंचायतीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 11:00 IST

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांची माहिती

ठळक मुद्देअनगर ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच अंकुश गुंड यांच्या अध्यक्षतेखाली आजी-माजी सैनिकांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला

अनगर : देशाच्या स्वातंत्र्यात आपले बलिदान दिलेले माजी सैनिक अन् सध्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर आपले कर्तव्य बजावणाºया सैनिक कुटुंबाची घरपट्टी पूर्णत: माफ करताना ती घरपट्टी अनगर ग्रामपंचायत भरणार असल्याचा निर्णय ग्रामसभेत घेतल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी रविवारी पत्रकारांना दिली. 

ते म्हणाले, १५ आॅगस्ट रोजी अनगर ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच अंकुश गुंड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत ग्ग्रामस्थांशी चर्चा करून अनेक ठराव संमत करण्यात आले. यात देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र डोंगराळ भागात, बर्फाळ भागात आई, वडील, पत्नी, बहीण, मुले यांच्यासह अन्य नातेवाईकांपासून दूर राहून सीमेवर आपली ड्यूटी बजावत असतात.

या जवानांच्या पराक्रमी कार्याचे कौतुक आणि त्यांना दिलासा मिळावा म्हणून आजी-माजी सैनिकांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय या ग्रामसभेने घेतला आहे. यावेळी सरपंच अंकुश गुंड, शहाजी गुंड , भागवत शिंदे, रवींद्र पाचपुंड, बाबासाहेब मुलाणी, प्रकाश कुलकर्णी, अमर मुलाणी, तानाजी पाचपुंड, ग्रामविकास अधिकारी सचिन कदम, पैगंबर शेख, बापू ऐतवाडे, महेश टिंगरे, अमोल जाधव आदी उपस्थित होते़

ग्रामस्थांचे मोठे योगदान- लोकनेते बाबुराव पाटील यांनी घालून दिलेल्या समतेच्या आदर्शावर आजतागायत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची बिनविरोधाची परंपरा अबाधित आहे तर माजी आमदार राजन पाटील व लोकनेते शुगरचे चेअरमन तथा जि. प. सदस्य बाळराजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत काटकसरीने कारभार करीत आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम व शासनाच्या अनेक योजना राबवून जिल्ह्यात स्मार्टग्राम बनविण्यासाठी ग्रामस्थांचे योगदान मिळाल्याचे सरपंच अंकुश गुंड यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरIndian Armyभारतीय लष्करSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद