शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून सापटणे (टें) येथे दोन गटात हाणामारी, चार गाड्यांचे नुकसान, तिघेजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 14:40 IST

सापटणे (टें) येथे  ग्रा.पं. पोटनिवडणुकीत झालेला पराभव सहन न झाल्याने व पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून पराभव झालेल्या गटाच्या १३  लोकांनी विजयी गटाच्या चारचाकी गाड्यांवर काठ्या, सळई, कोयते व दगडाने हल्ला केला.

ठळक मुद्दे चार गाड्यांच्या काचा फुटून तिघेजण जखमीदोन्ही गट आमदार बबनराव शिंदे यांचे समर्थक सध्या सापटणे गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस फोर्स तैनात करण्यात आला आहे

आॅनलाइन लोकमत सोलापूरटेंभुर्णी दि १ : सापटणे (टें) येथे  ग्रा.पं. पोटनिवडणुकीत झालेला पराभव सहन न झाल्याने व पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून पराभव झालेल्या गटाच्या १३  लोकांनी विजयी गटाच्या चारचाकी गाड्यांवर काठ्या, सळई, कोयते व दगडाने हल्ला केला. यामध्ये चार गाड्यांच्या काचा फुटून तिघेजण जखमी झाले आहेत. दोन्ही गट आमदार बबनराव शिंदे यांचे समर्थक आहेत.ही घटना बुधवार २८ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सापटणे-निमगाव रोडवरील विठ्ठल ढवळे यांच्या घराजवळील रोडजवळ घडली.  हा प्रकार तुकाराम बाळासाहेब ढवळे व विठ्ठल माणिक ढवळे यांच्या सांगण्यावरून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत दत्तात्रय सत्यवान ढवळे यांनी सचिन विनायक ढवळे, प्रतीक विश्वास ढवळे, प्रदीप रंगनाथ कोरडे, आण्णासाहेब गोविंद ढवळे, भाऊसाहेब जगताप, गणेश भैरुनाथ ढवळे, ब्रह्मदेव नागनाथ धोत्रे, विष्णू नागनाथ धोत्रे, जगन्नाथ हरिदास आतकर, स्वप्नील जांबूवंत ढवळे, आकाश आनंद ढवळे, नाना जनार्धन ढवळे व पांडुरंग प्र. ढवळे या १३ लोकांविरुद्ध  फिर्याद दिली आहे.या हल्ल्यात नानासाहेब सत्यवा ढवळे, आप्पाराव भागवत ढवळे व हनुमंत तनपुरे हे जखमी झाले आहेत. मतमोजणी बुधवारी झाली होती. यानंतर बाळासाहेब गटाचे लोक विजयी उमेदवारासह सापटणे येथून निमगाव येथे जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांना भेटण्यासाठी चार कार गाड्यात बसून निघाले होते. यावेळी दत्तात्रय ढवळे, नानासाहेब ढवळे, आप्पासाहेब ढवळे व हनुमंत तनपुरे हे चौघे एका गाडीत, दुसºया गाडीत सूरज ढवळे, बाळासाहेब ढवळे तर तिसºया  गाडीत रामचंद्र ढवळे व रोहित ढवळे हे दोघे तर चौथ्या गाडीतून संतोष ढवळे व माधव ढवळे निघाले होते. या सर्व गाड्यांचा ताफा  सापटणे - निमगाव रोडवरील विठ्ठल ढवळे यांच्या घराजवळून जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये कार गाड्यांच्या काचा फोडल्याने दोन लाखांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचे सापटणे व परिसरात तीव्र पडसाद उमटल्याने तणाव निर्माण झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जादा पोलीस फोर्स मागवून शांतता निर्माण करण्यात आली आहे. सध्या सापटणे गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस फोर्स तैनात करण्यात आला आहे.---------------------रोहित ढवळे विजयी- सापटणे गावात राजकीय दोन गट आहेत.एक गट बाळासाहेब ढवळे यांचा तर दुसरा एक गट तुकाराम बाळासाहेब ढवळे व विठ्ठल माणिक ढवळे यांचा आहे. २७ फेबु्रवारी रोजी येथे ग्रा.पं. निवडणुकीत एका जागेसाठी निवडणूक झाली होती. दोन्ही गटातच लढत झाली होती़ यात विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक बाळासाहेब ढवळे गटाचे रोहित जगन्नाथ ढवळे हे माजी उपसभापती तुकाराम ढवळे गटाचे तानाजी भीमराव ढवळे यांचा पराभव करून ८६ मतांनी विजयी झाले होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस