शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Good News; लॉकडाऊन काळात नोकरी गेलेल्यांना मिळणार रोजगार भत्ता

By appasaheb.patil | Updated: September 24, 2020 12:43 IST

कर्मचारी राज्य बिमा निगमचा उपक्रम; अटल बिमा कल्याण योजनेंतर्गत मिळणार पैसे

ठळक मुद्देकोरोनाकाळात नोकरी गेलेल्यांना ईएसआयसीच्या अटल बिमा व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत बेरोजगार भत्ता देण्यात येत आहेपूर्वी मिळणारा सरासरी पगाराच्या २५ टक्के भत्ता आता ५० टक्के करण्यात आला आहेजास्तीत जास्त ९० दिवसांचा असणार आहे व तो नोकरीवरून काढून टाकल्यानंतर ३० दिवसांनी मिळणार आहे

सोलापूर : कोरोना महामारीमुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात नोकरी गेलेल्या बेरोजगारांना आता कर्मचारी राज्य बिमा निगम अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अटल बिमा कल्याण योजनेंतर्गत बेरोजगार भत्ता दिला जाणार आहे. पूर्वी बेरोजगारांना दिला जात असलेला भत्ताच या कामगारांना मिळणार आहे, त्यात दुप्पट वाढ केल्याची माहिती कर्मचारी राज्य बिमा निगम, दमाणी नगरचे शाखा प्रबंधक शशिशेखर शिराळे व सहायक सुदर्शन पापरकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

कोरोना महामारीमुळे देशभर लॉकडाऊन पुकारण्यात आला होता़ त्याकाळात बाजारपेठा, उद्योगधंदे, खासगी कंपन्या, कारखाने आदी बंद ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते़ तब्बल पाच महिने लॉकडाऊन ठेवण्यात आला होता, त्यामुळे आर्थिक स्थिती ढासळली. उत्पादन कमी, पुरवठा कमी झाल्याने अनेक कंपन्यांच्या व्यवस्थापनाने कामगारांना कामावरून काढून टाकले़ त्यामुळे कोरोनाकाळात बेरोजगारांची संख्या दुप्पट झाली़ या बेरोजगारांना दिलासा देण्यासाठी शासनाने अटल बिमा कल्याण योजनेंतर्गत बेरोजगार भत्ता देण्याचे जाहीर केले़ हा बेरोजगार भत्ता आता दुप्पट मिळणार आहे.

------असा मिळेल भत्ता...दोन वर्षे नोकरी करून २४ मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या दरम्यान बेरोजगार झालेल्या ईएसआयसीमधील नोंदणीकृत कामगारांना हा बेरोजगार भत्ता देण्यात येणार आहे़ यासाठी कामगारांनी www.esic.in या पोर्टलवर लॉगइन करून आॅनलाईन फॉर्म भरावयाचा आहे़ त्यानंतर त्या फॉर्मची प्रत, आधारकार्ड, बँक पासबुक, चेकच्या प्रतिसह कर्मचारी राज्य बिमा निगम, दमाणी नगर शाखेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाकाळात नोकरी गेलेल्यांना ईएसआयसीच्या अटल बिमा व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत बेरोजगार भत्ता देण्यात येत आहे. पूर्वी मिळणारा सरासरी पगाराच्या २५ टक्के भत्ता आता ५० टक्के करण्यात आला आहे़ हा भत्ता जास्तीत जास्त ९० दिवसांचा असणार आहे व तो नोकरीवरून काढून टाकल्यानंतर ३० दिवसांनी मिळणार आहे़ तरी जास्तीत जास्त बेरोजगारांनी या भत्त्याचा लाभ घ्यावा.- सुदर्शन पापरकर, कर्मचारी राज्य बिमा निगम, दमाणी नगर, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरी