शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Good News; सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ) कार्यालय सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 14:45 IST

एमपीएससी परीक्षा देणाºया उमेदवारांना व्हीआयपी कोट्यातून मिळणार परवाना

ठळक मुद्दे- सोलापूरचे आरटीओ कार्यालय अडीच महिन्यांपासून होते बंद- कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बंद करण्यात आले होते आरटीओ - कच्चे व पक्के लायसन्ससह इतर आरटीओची कामे झाली सुरू

सोलापूर : कोरोना या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी मागील अडीच महिन्यांपासून बंद करण्यात आलेले विजापूर रोडवरील उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोना या संसर्गजन्य आजाराने भारतासह महाराष्ट्रातही थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता़ अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता़ त्यामुळे मागील अडीच महिन्यांपासून सोलापुरातील आर.टी.ओ कार्यालय बंद ठेवण्यात आले होते़ आता अनलॉक च्या पहिल्या टप्प्यात काही नियम व अटी घालून उद्योग, कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे़ त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशान्वये सोलापुरातील आरटीओ कार्यालये सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

दरम्यान, लायसन्स व वाहनविषयक कार्याकरिता परिवहन सेवा या वेबसाईटवरून अ‍ॅपॉईटमेन्ट घेवूनच कामासाठी अर्ज करता येणार आहे, लर्निंग लायसन्ससाठी कॉम्पुटर टेस्ट घेताना दोन अर्जदारांमध्ये किमान ६ फुटांचे अंतर ठेवण्यात येणार आहे़ एका अर्जदाराची चाचणी झाल्यास संगणक व की बोर्ड सॅनिटायझर करून घेण्यात येणार आहे़ अर्जदारास मास्क व हॅडग्लोज घालूनच प्रवेश करता येऊ शकणार असल्याचे परिवहन विभागाने कळविले आहे.

ज्या अर्जदारांनी आर.टी.ओ. असिस्टंट इन्स्पेक्टरच्या एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरलेले असतील त्या उमेदवारांचे कच्चा व पक्या लायसन्सचे काम व्हीआयपी कोट्यातून करण्यात येणार असल्याचेही परिवहन विभागाने सांगितले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीसcorona virusकोरोना वायरस बातम्या