शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Good News; कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी पाच तालुक्यात शीतगृहाची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:15 IST

९८०३ लिटर फ्रीजची तयारी : तापमानाच्या मानंकनानुसार शीतगृहाचा आहे शोध सुरू

ठळक मुद्देकोरोनाची लस दाखल झाल्यानंतर गावोगावी लसीकरणाचे कॅम्प करण्यासाठी डीप फ्रीजची सोय असलेल्या ९६ गाड्या लागणार कोरोना लस साठविण्पासाठी उणे १० ते २० अंशाचे शीतगृह आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे

राजकुमार सारोळे

सोलापूर :कोरोना लस येणार म्हणून आरोग्य विभागाने लस साठविण्याची तयारी सुरू केली आहे. राज्य आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य विभागाने सोलापूर शहर, तालुके आणि ग्रामीण भागात लस साठविण्यासाठी ९ हजार ८०३ लिटर फ्रीजची तयारी केली आहे.

जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी कोरोना लस साठविण्यासंदर्भात बैठक घेतली. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, लसीकरण विभागप्रमुख तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्या उपसिथतीत लसीचा साठा कसा करायचा याचे नियोजन करण्यात आले. जिल्हास्तरावर एक मोठे शीतगृह लागणार असल्याने कृषी विभागावर मनुकासाठी उभारलेले एक शीतगृह तयार ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. याचबरोबर जिल्हा आरोग्य, महापािलका व ग्रामीण रुग्णालयात तयारी केली आहे. 

७ अंशाचे आहेत शीतगृहकोरोना लस साठविण्पासाठी उणे १० ते २० अंशाचे शीतगृह आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. लस कोणत्या कंपनीची येणार यावर हे तापमान ठरेल. पण सध्या फळ साठवणुकीसाठी वापरात असलेले ७ अंशाच्या क्षमतेचे खाजगी शीतगृह तयार ठेवण्यात आले आहेत.त्याचबराबेर प्राथिमक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व मनपा केंद्रात फ्रीज ठेवणार आहेत.

लस पोहोचविण्यासाठी ९६ गाड्याकोरोनाची लस दाखल झाल्यानंतर गावोगावी लसीकरणाचे कॅम्प करण्यासाठी डीप फ्रीजची सोय असलेल्या ९६ गाड्या लागणार आहेत. यात जिल्हा परिषद प्राथिमक आरोग्य केंद्राच्या ७७, ग्रामीण रुग्णालयाच्या १४ तर महापालिका आरोग्य विभागाच्या ५ गाड्यांचा समावेश आहे. 

जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना लस साठविण्याचे नियोजन केले आहे. सोलापूर शहर, १०२९ ग्रामपंचायती व तालुक्यातील नगरपंचायतीनुसार लसीकरण करण्याची तयारी आहे. यासाठी लागणारे मनुष्यबळ, वाहने, फ्रीजची तयारी सुरू आहे.- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्यअधिकारी

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या