शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाला चांगले दिवस येणार, पोखरापूर यात्रेतील भाकणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 15:58 IST

‘विठ्ठल-बिरुदेवाचं चांगभलं’च्या जयघोषात भंडाºयाची उधळण करीत पोखरापूर येथील विठ्ठल-बिरुदेवाची यात्रा दिवाळी पाडव्यादिवशी गुरू-शिष्य भेटीच्या सोहळ्याने पार पडली.

ठळक मुद्देविठ्ठल-बिरुदेवाचं चांगभलं म्हणत तीस हजार भाविकांनी दर्शन घेतले.                          सर्व जातीधर्माचे लोक सहभागीयंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक

आॅनलाइन लोकमत सोलापूरमोहोळ दि २३ : ‘विठ्ठल-बिरुदेवाचं चांगभलं’च्या जयघोषात भंडाºयाची उधळण करीत पोखरापूर येथील विठ्ठल-बिरुदेवाची यात्रा दिवाळी पाडव्यादिवशी गुरू-शिष्य भेटीच्या सोहळ्याने पार पडली. विठ्ठल-बिरुदेवाचं चांगभलं म्हणत तीस हजार भाविकांनी दर्शन घेतले.                          धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल-बिरुदेवाच्या यात्रेला सर्व जातीधर्माचे लोक सहभागी झाले होते. विठ्ठल-बिरुदेवाची मनोभावे पूजा करणारे भक्त खेलोबा पुजारी हे पोखरापूर-आढेगावच्या दरम्यान असलेल्या माळरानावर मेंढ्या चारण्यासाठी येत. त्या माळाला दंडाचा माळ या नावाने ओळखले जाते. याच माळावर खेलोबा याच भक्ताला भेटण्यास कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथून विठ्ठल-बिरुदेव (बंधू) आले होते. तो दिवस म्हणजे दिवाळी पाडव्याचा दिवस. भक्त खेलोबा पुजारी यांनी २४ वर्षे विठ्ठल-बिरुदेवाची आराधना केली. त्यामुळे प्रसन्न होऊन विठ्ठल-बिरुदेव भक्त खेलोबा पुजारी यांना भेटायला आले. तो दिवस म्हणजे दिवाळी पाडव्याचा होय. या दिवशी दरवर्षी यात्रा भरते. यात्रेला धनाजी विठोबाची यात्रा असे संबोधले जाते. या दिवशी दुपारी तीन वाजता पोखरापूर गावातून विठ्ठलाची कन्या भागुबाईची पालखी वाजत-गाजत विठ्ठल मंदिराकडे निघते. सोबत छबिना, ढोल, देवाची छत्री, शिंग, निशाणासह वाजत गाजत जाते. यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने यात्रेला आलेल्या भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. यावेळी झालेल्या भाकणुकीत आगामी काळात बळीराजाला चांगले दिवस येतील अशी देवाची भाकणूक झाली आहे. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.