शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील नगरसेविकांनी सुचविलेल्या कामांवर आले गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 12:13 IST

मनपा आयुक्त अविनाश ढाकणे यांचा आदेश: खासगी सोसायट्यांमधील कामे नाहीत

ठळक मुद्देनवीन नगरसेवकांना प्रभागात विकासकामे करण्यासाठी निधी मिळाला नाहीठेकेदारांची बिले मोठ्या प्रमाणावर थकल्याने मनपाची कामे करण्यास कोणी तयार नाही

सोलापूर: नगरसेवकांनी भांडवली निधीतून सुचविलेल्या खासगी सोसायट्यांमधील रस्ते, दिवाबत्तीच्या कामांवर आयुक्तांच्या आदेशान्वये गंडांतर आले आहे. 

महापालिकेत सत्तांतर झाल्यापासून नवीन नगरसेवकांना प्रभागात विकासकामे करण्यासाठी निधी मिळाला नव्हता. करवसुलीतून तिजोरीत थोडीशी पुंजी जमा झाल्यानंतर आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी गरजेच्या कामांना निधी देण्यास सुरुवात केली आहे. पण ही कामे खासगी सोसायट्यांमध्ये करायची नाहीत, अशी तंबी विभागीय अधिकाºयांना दिली आहे.

शासन अध्यादेशानुसार लोकप्रतिनिधींच्या विकास निधीतून कोणत्या प्रकारची कामे घ्यावीत याचे निकष ठरलेले आहेत. त्याप्रमाणेच कार्यवाही झाली पाहिजे, असे आदेश आयुक्त डॉ. ढाकणे यांनी दिले आहेत. शासनाकडून आलेला निधी व मनपाचा पैसा खासगी जागांपेक्षा सरकारी जागा विकसित करण्यावर भर द्यावा, असे सूचित केले आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर सर्वच नगरसेवकांनी प्रभागातील सुचविलेली बहुतांश कामे सोसायट्यांमधील रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती करण्याची आहेत. या नियमामुळे या विकासकामांना खीळ बसणार आहे. 

एकीकडे ठेकेदारांची बिले मोठ्या प्रमाणावर थकल्याने मनपाची कामे करण्यास कोणी तयार नाही. जे ठेकेदार काम करीत आहेत, त्यांच्याकडून गुणवत्तेबाबत साशंका आहे. जुनी पोलीस लाईनमध्ये ड्रेनेजलाईन बदलण्याचे काम सुरू आहे. यामुळे प्रॉपर्टी कनेक्शन तुटले आहेत. हे कनेक्शन जोडण्यासाठी ठेकेदाराकडून पैशाची मागणी केली जात आहे, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. यापुढे प्लॉटिंग विकासकांना परवानगी देताना रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्तीची कामे झाल्याची खात्री केली जाणार आहे. अशी कामे पूर्ण केलेली असली तरच प्लॉटिंगला परवानगी दिली जाणार असल्याचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्पष्ट केले आहे. 

यामुळे झाला बदल- आयुक्त डॉ. ढाकणे यांनी खासगी सोसायट्यांना सुविधा बंदचा फतवा यामुळे काढला. इंदिरानगर सोसायटीतील रस्त्यांचा वाद निर्माण झाला. सोसायटीने रस्ते आम वाहतुकीसाठी बंद केले. याबाबत मनपाकडे तक्रार आल्यावर विभागीय अधिकाºयांनी दखल घेतली. त्यावेळी सोसायटीधारकांनी रस्त्यावर फक्त सोसायटीचा हक्क आहे. हस्तक्षेप करण्याचा मनपाचा काय संबंध, असा सवाल उपस्थित केला. वास्तविक हे रस्ते मनपाने केलेले होते. पण सोसायटीधारकांनी कायद्यात पकडल्यामुळे आता हा जाच सर्व खासगी सोसायटीधारकांना सोसावा लागणार आहे.

प्लॉट घेताना खात्री करा- नागरिकांनी शहर किंवा हद्दवाढ भागात यापुढे प्लॉट घेताना विकासकाने रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती आणि जलवाहिनीची सोय केली आहे की नाही हे तपासा. आतापर्यंत हद्दवाढ भागात जी नगरे वसली, त्यात या बाबी नागरिकांनी पाहिल्याच नाहीत. आता महापालिकेने या सुविधा द्याव्यात, अशा मागण्या केल्या जात आहेत. त्यासाठी नागरिकांनी सोसायट्यांची स्थापना करून रितसर मनपाकडे हस्तांतरित करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका