शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गणरायाच्या स्वागताला सोन्याचे गजराज; मुकूट अन् अलंकारांनाही झळाळी चांदीची

By काशिनाथ वाघमारे | Updated: September 15, 2023 19:09 IST

घराघरात आनंद वाढवणा-या गणरायाचे मंगळवारी आगमन होत आहे.

सोलापूर : घराघरात आनंद वाढवणा-या गणरायाचे मंगळवारी आगमन होत आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागताला यंदाही सोन्याचा गजराज आणि चांदीची आभुषणं आली आहेत. सार्वजनिक मंडळांपेक्षा घरगुती गणरायाच्या सजावटीत चांदीच्या अलंकारांना सर्वाधीक मागणी आहे.

देवाच्या दागिन्यांचा वापर हा अहमदनगरसह पश्चीम महाराष्ट्रात सर्वाधीक आहे. गेल्या दहा वर्षात चांदींच्या आभुषणांचा आणि मागील पाच वर्षात त्याबरोबर सोन्याच्या वस्तुंचाही वापर वाढत गेला. गणरायाच्या काणातील फुलं, किरीट, गळ्यातील हारदेखील चांदीपासून बनवली गेली आहेत. त्यासाठीची घडणावळ १० ते ३० टक्के असते. आता या तयार वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. विशेषत: १ सप्टेंबरपासून चांदीचा दर (७१,५०० रु. किलो) ही स्थीर आहे. नवरात्रपर्यंत तो स्थीर राहील असे सराफ व्यवसायिकातून सांगितले जाते.

 देवांच्या आभुषणांसाठी बालगोपाळ, महिलांची पावलं ही सराफ बाजाराकडे वळाली आहेत. बहुतांश आभुषणं अर्थात कमळसह त्रिशुल, गदा, चक्र, परशु ही शस्त्रही चांदीत बनवलेली अनेक प्रकारात आढळताहेत. मोदक, जाणवं, दुवार्ची जुडी, हातात बांधला जाणारा गजरा आणि मुशकही चांदीत बनवलेली आहेत.   बाहेरगावाहून मुलं येताहेत दागिने घेऊननोकरीनिमित्त बऱ्याच कुटूंबातील मुलं, मुलीही पुणे, मंबई शहरात स्थायिक झाली आहेत. या गणेशोत्सवात ही मुलं घरी येताना ते चांदीची आभुषणं आणताहेत. अगदी लहान वस्तुंपैकी कानातील फुलं आणि कमी वजनाची दागिने १५ ग्रॅम ते किलो वजनात बनताहेत. काही दागिने ५०० रुपयांपासून उपलब्ध होतात. बाहेर गावाहून येताना ही दागिने मुलं घरच्या गणपतीसाठी घेऊन येताहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर