शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनारसिद्धचे दर्शन उरकून पंढरपूरला निघालेले ५ भाविक कार अपघातात ठार
2
MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: PSI परीक्षेचा निकाल जाहीर, कोणी पटकावला प्रथम क्रमांक?
3
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
4
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
5
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
6
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
7
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
8
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
9
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
10
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
11
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
12
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
13
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

सोलापुरात २०२२ पर्यंत २ हजार गारमेंटस् युनिटस् सुरू करण्याचे लक्ष्य, २७ जानेवारीपासून आंतरराष्टÑीय वस्त्रप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 5:33 PM

काहीशा असंघटीत स्वरूपात असलेला येथील गणवेशनिर्मिती आणि गारमेंट उद्योग आता संघटीत होण्याच्या मार्गावर असून, सन २०२२ पर्यंत शहरात २ हजार नवीन गारमेंट आणि रेडीमेड कपड्याचे युनिटस् उभारण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदोन दिवसांच्या या प्रदर्शनातील सहभागासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील दूतावासांना निमंत्रण दिलेवस्त्रोद्योगासंदर्भातील नवीन तंत्रज्ञानही येथे उपलब्ध करण्यात येणार१४ राज्यातील रिटेलर,डिलर्स आणि वितरकांना निमंत्रण१९८ भारतीय दूतावास आणि १६४ भारतातील दूतावासांना निमंत्रण

रवींद्र देशमुख सोलापूर दि २३ : काहीशा असंघटीत स्वरूपात असलेला येथील गणवेशनिर्मिती आणि गारमेंट उद्योग आता संघटीत होण्याच्या मार्गावर असून, सन २०२२ पर्यंत शहरात २ हजार नवीन गारमेंट आणि रेडीमेड कपड्याचे युनिटस् उभारण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाच्या या प्रयत्नाला राज्य सरकारने प्रोत्साहन दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या २७ जानेवारीपासून आंतरराष्टÑीय गणवेश व वस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या या प्रदर्शनातील सहभागासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील दूतावासांना निमंत्रण दिले आहे. या प्रदर्शनामुळे सोलापूरला देशातील गारमेंट व गणवेश हब करण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल, असा विश्वास रेडीमेड कापड उत्पादक संघाचे अध्यक्ष रामवल्लभ जाजू यांनी आज ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.सोलापुरात सध्या ५०० गणवेश युनिटस् कार्यरत आहेत. उत्तम शिलाई, कमी दर आणि तत्काळ उपलब्धता, या वैशिष्टयांमुळे येथील या उद्योगाने लौकिक प्राप्त केला आहे. गणवेश उद्योगातील बँडेड कंपन्या सोलापुरातील या युनिटस्ची संपर्क साधून काम करून घेत आहेत; पण असंघटीतपणामुळे उद्योगाचे व्यापक स्वरूप येथील गणवेश व्यवसायाला आले नाही. रेडीमेड कापड उत्पादक संघ मात्र आता गारमेंटस्, गणवेश व्यवसायाला उद्योगाचे स्वरूप देण्यासाठी पावले उचलत आहेत. सध्या सुरू असलेल्या गारमेंट युनिटस्ना आणि भविष्यात सुरू होणाºया युनिटस्ना कुशल कामगार उपलब्ध करून देण्यासाठी आजवर तीनशे महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे जाजू यांनी सांगितले. येथे टेक्स्टाईल्सचे ५०० कारखानदार आहेत. सुमारे पंचेवीस हजार कामगार या उद्योगावर अवलंबून आहेत; पण सध्या चादर आणि टॉवेल उत्पादनाचा हा उद्योग विविध कारणांमुळे अडचणीत सापडला आहे. या स्थितीत नव्याने व्यापक स्वरूप धारण करणाºया गणवेश, गारमेंट उद्योग सोलापूरच्या रोजगार निर्मिती व अर्थकारणावर सकारात्मक परिणाम करणारा ठरेल, अशी आशा व्यक्त होत आहे.--------------------------वस्त्र प्रदर्शनाविषयी- या  आंतरराष्टÑीय प्रदर्शनामध्ये शालेय उपयोगातील वस्तू पाहायला मिळतील. यामध्ये बॅगा, बेल्टस्, टॉईज्, याशिवाय प्रवासी बॅगांचाही समावेश आहे. - देशभरातील कंपन्यांचे गणवेश- वस्त्रोद्योगासंदर्भातील नवीन तंत्रज्ञानही येथे उपलब्ध करण्यात येणार आहे.- १४ राज्यातील रिटेलर,डिलर्स आणि वितरकांना निमंत्रण- १९८ भारतीय दूतावास आणि १६४ भारतातील दूतावासांना निमंत्रण

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योग