शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण द्या मगच दौरे करा, म्हणत अजित पवार यांच्या माढा दौऱ्याला विरोध!

By रवींद्र देशमुख | Updated: October 19, 2023 15:08 IST

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी माढा दौऱ्यावर येत आहेत.

रवींद्र देशमुख

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी माढा दौऱ्यावर येत आहेत. मराठा आरक्षण द्या मगच दौरे करा असे म्हणत अजित पवार यांच्या दौऱ्याला माढा सकल मराठा समाजाच्या वतीने विरोध दर्शविण्यात आलेला आहे. याबाबत माढा पोलिसांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील आमदार बबनराव शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी खा. शरद पवारही माढा तालुक्यातील कापसेवाडी येथील शेतकऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थिती लावून मार्गदर्शन करणार आहेत.  राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार व अजित पवार दोघेही एकाच दिवशी माढा तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याने राजकारणात मोठी चर्चा आहे.

त्यातच गुरुवारी माढा सकल मराठा समाजाच्या वतीने माढा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.  त्या निवेदनात म्हटले की, मराठा आरक्षण द्या मगच दौरे करा या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील कार्यक्रमास  प्रवेश बंदी करण्यात येत आहे. तसे न झाल्यास मराठा समाजाच्या रोशाला सामोरे जावे लागणार आहे असेही त्या निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर आणखीन ताण वाढला आहे.