शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

सोलापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी जर्मन कंपन्यांचा पुढाकार, ‘उजनीच्या पाणी प्रदूषणावर देशपातळीवर प्रयत्न हवेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 16:25 IST

औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमुळे होणारे वायू प्रदूषण थांबविणे, जल प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण तसेच सांडपाणी प्रक्रिया पुनर्वापरात सुधारणा करण्याबाबत जर्मनीच्या विविध ११ कंपन्यांच्या पुढाकारातून चिंचोळी-कोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये चर्चासत्र घडवून आणले.

ठळक मुद्देसोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने कै. जयकुमार पाटील सभागृहात जर्मनीच्या बाडन हिटम्बर्ग राज्यातील कंपन्यांचे सादरीकरणबाडन हिटम्बर्ग या राज्यातील ११ कंपन्यांच्या प्रमुखांनी चिंचोळी औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांशी चर्चा केलीभारतात मेक इन इंडियाच्या माध्यमातून उद्योगाला चालना दिली जात असून याचाच हा एक भाग असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३० : औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमुळे होणारे वायू प्रदूषण थांबविणे, जल प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण तसेच सांडपाणी प्रक्रिया पुनर्वापरात सुधारणा करण्याबाबत जर्मनीच्या विविध ११ कंपन्यांच्या पुढाकारातून चिंचोळी-कोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये चर्चासत्र घडवून आणले. सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने कै. जयकुमार पाटील सभागृहात जर्मनीच्या बाडन हिटम्बर्ग राज्यातील कंपन्यांचे सादरीकरण करण्यात आले.जर्मनीतील बाडन हिटम्बर्ग या राज्याचे पथक मागील वर्षी जानेवारी २०१७ मध्ये आले होते. त्यावेळी उद्योग क्षेत्रातील समस्यांवर चर्चा झाली होती. त्यावेळी ठरल्यानुसार बाडन हिटम्बर्ग या राज्यातील ११ कंपन्यांच्या प्रमुखांनी चिंचोळी औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांशी चर्चा केली तसेच त्यांनी थरमॅक्स, एल.एच.पी. या कंपन्यांची पाहणीही केली. सध्या भारतात मेक इन इंडियाच्या माध्यमातून उद्योगाला चालना दिली जात असून याचाच हा एक भाग असल्याचे यावेळी सांगण्यात आले. लेटस् ब्रीज या कंपनीनेबाडन हिटम्बर्ग या राज्यातील ११ कंपनी चालकांसह १९ प्रमुखांनी चिंचोळी औद्योगिक वसाहतीमधील उद्योगाबाबतच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष केशव रेड्डी, माजी अध्यक्ष शरदकृष्ण ठाकरे, सचिव गणेश सुत्रावे, कमलेश शहा, अमोल गोडबोले, रामेश्वरी गायकवाड, अभिषेक तापडिया, सप्रेम कोठारी आदींसह जर्मन कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. ----------------------दृष्टिक्षेप...- बाडन हिटम्बर्ग’ राज्यात सव्वादोन लाख कंपन्या- जर्मन उद्योग व भारतीय कंपन्या एकत्र आणण्याचा उद्देश- कंपन्यांच्या देवाण-घेवाणीतून भारतीय कंपन्यांतून होणारे वायू प्रदूषण थांबविणे, जल प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण तसेच सांडपाणी प्रक्रिया पुनर्वापरात सुधारणा करण्याबाबत उपाययोजना केल्या जाणार आहेत.- जर्मन उद्योग कंपन्यांचे हे पथक पुणे, सोलापूर, नागपूर व मुंबईतील कंपन्यांशी चर्चा करून प्रदूषणाबाबत उपाय सुचविणार आहेत.- जर्मनीत लहान-लहान कुटुंबांनी सुरू केलेल्या व्यवसायाचे मोठ्या कंपन्यांत रूपांतर झाले असून बाडन हिटम्बर्ग या राज्यात सव्वादोन लाख कंपन्या आहेत.- सोलापूरचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश केल्याने तसेच सोलापुरात उद्योगवाढीसाठी वाव असल्याने सोलापूरची निवड. - दोन दिवसातील चर्चेत प्रदूषणावर बरेच काही करता येईल, असे जर्मन कंपनी चालकांचे मत.-------------------...तर ‘माळढोक’ला अडचणी नाही !- पर्यावरण स्वच्छ असेल तर माळढोक पक्ष्याला काहीच अडचण नाही. जर्मनीत २५-३० वर्षांखाली अशा समस्या आल्या होत्या; मात्र मार्ग काढून उद्योग उभारल्याचे जर्मन कंपन्यांकडून सांगण्यात आले. उजनी धरणातील पाणी प्रदूषणाच्या मुद्यावर नद्यांच्या विविध टप्प्यावर तंत्रज्ञान वापरून पाणी स्वच्छ केले पाहिजे जे जर्मनमध्ये केले जाते, अशा मोठ्या धरणातील पाणी प्रदूषणावर देश व राज्य पातळीवर प्रयत्न होणे अपेक्षित असल्याचे सांगून जर्मनीतील राईन नदी प्रदूषणाचे उदाहरण जर्मन उद्योगपतींनी दिले. 

टॅग्स :Solapurसोलापूर