शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गणपतराव देशमुख स्मारक पूर्ण; पुतळा अनावरणासाठी पवार, फडणवीस, आठवले, शिंदे उद्या सांगोल्यात

By appasaheb.patil | Updated: August 11, 2023 17:48 IST

डॉ. गणपतराव देशमुख स्मारक अनावरण व महाविद्यालय नामांतरण सोहळा हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते होणार आहे

सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी कृषी पणन व रोजगार हमी योजना मंत्री स्वर्गीय माजी आमदार भाई डॉ. गणपतराव देशमुख यांचे स्मारक अनावरण व महाविद्यालय नामांतरण सोहळा रविवार १३ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक डॉ. अनिकेत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. गणपतराव देशमुख स्मारक अनावरण व महाविद्यालय नामांतरण सोहळा हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, शेकापक्षाचे सरचिटणीस आ. जयंतराव पाटील, पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे -पाटील, राष्ट्रवादी (पवार गट) प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी सभापती आ. रामराजे निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील आदी उपस्थित राहणार आहे. न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे कार्यक्रम होणार आहे.

या पत्रकार परिषदेसाठी ज्येष्ठ नेते पोपटराव देशमुख, संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे, दीपक खटकाळे अशोकराव शिंदे, प्राचार्य सिकंदर मुलाणी, प्राचार्य आदलिंगे ,अवधूत कुमठेकर, उद्योगपती उल्हास धायगुडे, डॉ. बाळकृष्ण जगताप, प्रशांत वलेकर, हनुमंत कोळवले, बाळकृष्ण कोकरे उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूर