शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहरातील गणेश मूर्तींचे वॉर्डा-वॉर्डात होणार संकलन...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:40 IST

गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...; घरीच विसर्जन करण्याचेही महापालिकेकडून आवाहन

ठळक मुद्देधर्मवीर संभाजी तलाव, सिद्धेश्वर तलाव परिसरात गणेशमूर्तींचे विसर्जन करु नये यासाठी महापालिकेने फलक लावलेमहापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त धनराज पांडे, नगरअभियंता संदीप कारंजे यांच्यासमवेत बैठक घेतलीनागरिकांनी आपल्या घरातच गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याचे फोटो मनपाकडे पाठवावेत

सोलापूर  : शहरातील भक्तांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करावे यासाठी जनजागृतीचे प्रयत्न सुरू आहेत. गणेश मूर्तींचे वॉर्डनिहाय संकलन करण्यासाठी विभागीय अधिकाºयांची बैठक घेण्यात येणार असल्याचे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा गणेश भक्तांनी आपल्या घरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. सार्वजनिक मंडळांनी जिथे मूर्तीची प्रतिष्ठापना केली तिथेच मूर्ती विसर्जनाचा प्रयत्न करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. परंतु, काही भक्त दीड दिवसाच्या, पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी तलावाच्या ठिकाणी जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने अनंत चतुदर्शीच्या दिवशी वॉर्डात जाऊन गणेशमूर्तींचे संकलन करण्याचे नियोजन सुरू केले आहे.

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त धनराज पांडे, नगरअभियंता संदीप कारंजे यांच्यासमवेत बैठक घेतली. पुढील चार दिवसांत नागरिकांना आवाहन करण्यात यावे. नागरिकांनी आपल्या घरातच गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याचे फोटो मनपाकडे पाठवावेत. त्यासाठी आकर्षक बक्षीस योजना जाहीर करण्यासह इतर उपक्रम राबविण्याचे आदेश देण्यात आले.

काही भक्त आपल्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मनपाकडे देऊ इच्छित असतील तर प्रभागात कंटेनर ठेवण्यात यावेत. हे कंटेनर व्यवस्थितपणे विसर्जनस्थळी नेण्यात यावेत. यासंदर्भात योग्य ते नियोजन करावे, असेही आयुक्तांनी सुचवले.

तलाव परिसरात पोलीस बंदोबस्तधर्मवीर संभाजी तलाव, सिद्धेश्वर तलाव परिसरात गणेशमूर्तींचे विसर्जन करु नये यासाठी महापालिकेने फलक लावले आहेत. तरीही अनेक नागरिक या ठिकाणी विसर्जनासाठी येत असल्याचे निदर्शनास येत आहे. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी संभाजी तलाव परिसरात काही नागरिकांवर कारवाई केली. 

गणेश विसर्जनासंदर्भात महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त संयुक्तपणे निवेदन करणार आहेत. काही मंडळांना आपल्या भागात विसर्जनाची व्यवस्था करायची असेल तर त्यासाठी मनपा मदत करेल. शासन नियमांचे उल्लंघन करुन कोणीही विसर्जन करू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळजी घ्यावी.   -धनराज पांडे, उपायुक्त, मनपा.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाGanesh Mahotsavगणेशोत्सव