शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

ग्रीनफिल्डच्या बाधित शेतकऱ्यांची गांधीगिरी तलाठ्यांचा सत्कार; मोबदला वाढीची मागणी 

By दिपक दुपारगुडे | Updated: December 19, 2023 18:40 IST

चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड हायवेचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे.

सोलापूर : चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड हायवेचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. अत्यल्प मोबदला मिळाल्यामुळे गेल्या दीड वर्षापासून शासन आणि बाधित शेतकऱ्यांमध्ये वाद सुरू आहे. अत्यल्प मोबदल्यामध्ये आमची जमीन देणार नाही या मतावर बाधित शेतकरी ठाम असताना बळजबरीने जमीन संपादित करण्याविषयी नोटीस घेऊन गावात आलेल्या तलाठ्यांचा सत्कार करत बाधित शेतकऱ्यांनी गांधीगिरी दाखवून दिली व शासनाला एक प्रकारे आव्हान दिले. वारंवार आवाहन करूनदेखील बाधित शेतकरी अत्यल्प किमतीत आपली जमीन देण्यासाठी तयार नसताना आता जिल्हा प्रशासनाकडून जमीन पोलिसांच्या मदतीने सक्तीने अधिग्रहित करण्याविषयी बाधित शेतकऱ्यांना तलाठ्याच्या माध्यमातून ३ ईच्या नोटिसा देत आहेत. 

मात्र अक्कलकोट तालुकयातील दहीटणेवाडी येथील बाधित शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी गावात आलेल्या गाव कामगार तलाठी नुरुद्दीन मुजावर यांच्याकडून आलेल्या नोटिसा न स्वीकारता उलट त्यांचा सत्कार करत शासनाला एक प्रकारे आव्हान दिले. यावेळी सरपंच रोहित जाधव, उपसरपंच शिवलिंग हंनचेंजे, संघर्ष समितीचे चेतन जाधव, सुभाष शिंदे, अमोल काळे, नंदकुमार माने आदी उपस्थित होते.

दहिटणेवाडी येथील शेतकऱ्यांनी जी गांधीगिरी केली याचे मी समर्थन करतो व लढा आणखीन तीव्र होण्याअगोदर शासनाने तत्काळ बैठकीसाठी प्रयत्न करण्याची मी विनंती करतो. अन्यथा नव्या वर्षात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा बाळासाहेब मोरे यांनी दिला आहे. अहवाल सादर करणारनोटिसा देण्यासाठी मी बाधित शेतकऱ्यांकडे गेलो असता त्यांच्या भावना तीव्र झाल्याचे मला कळले. त्यांनी नोटिसा घेतल्या नसून सामूहिकरीत्या विरोध दर्शविला आहे. उलट माझा सत्कार त्यांनी केला आहे. याविषयी प्रशासनाला अहवाल सादर करेन, असे तलाठी नुरुद्दीन मुजावर यांनी सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूर