आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २९ : व्याजाने दिलेली रक्कम परत न केल्याच्या कारणावरून चिडून भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी पांजरापोळ चौक येथे चाकूने भोसकून फळ विक्रेत्याचा खून केल्याप्रकरणी लक्ष्मण नामदेव भोसले (रा़ आण्णाभाऊ साठे नगर, जय मल्हार चौक, सोलापूर) यास दोषी ठरवून अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी़ के़ अनभुले यांनी आजन्म कारावासाची शिक्षा व दोन लाख रूपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली़ किरण लकुळ आष्टूळ याने आरोपी लक्ष्मण भोसले यांच्याकडून ५० हजार रूपये कर्ज घेतले होते़ यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड़ संतोष न्हावकर यांनी तर आरोपीतर्फे अॅड़ धनंजय माने यांनी काम पाहिले़
फळ विक्रेत्याचा खून, सोलापूरातील सावकारास जन्मठेप, दोन लाखांचा दंड
By appasaheb.dilip.patil | Updated: July 29, 2017 17:42 IST