शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीतील आठ दुकाने फोडणाऱ्या चौघांना मुंबईत पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:47 IST

बार्शी : बार्शी शहरात चार दिवसांपूर्वी विविध भागातील व्यवसाय करणाऱ्या आठ दुकानाची बंद शटर्स तोडून चोरट्यांनी त्यातील साहित्यासह रोख ...

बार्शी : बार्शी शहरात चार दिवसांपूर्वी विविध भागातील व्यवसाय करणाऱ्या आठ दुकानाची बंद शटर्स तोडून चोरट्यांनी त्यातील साहित्यासह रोख २ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. पोलिसांनी ४८ तासात तपास करून चार आरोपींना अटक करण्यात आली. त्या चौघांना बार्शी न्यायालयात न्यायमुर्ती.आर. एस. धडके यांच्या समोर हजर केले असता, त्यांना ३ सप्टेंबर पोलीस कोठडी सुनावली आहे.

मारुती चंद्रशेखर दासर (वय २७), महेंद्र अविनाश पाटील (वय २५), अभिजित गौतम कांबळे (वय २४), अजय अर्जुन कानगुलकर (वय २२, सर्व रा. नवी मुंबई) अशी त्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही चोरीची घटना शुक्रवारी दुकाने बंद करून गेल्यानंतर शनिवारी पहाटेच्या दरम्यान घडली.

याबाबत आज सर्वांच्या वतीने गणेश भीमराव कानडे (वय ३९, रा. सौंदरे, ता. बार्शी) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. हे आरोपी बार्शीच्या गुन्ह्यात वापरलेल्या कारचा नंबर बदलून वापर करीत होते.

हा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सर्जेराव पाटील, शहर पोलीस निरीक्षक आर. आर. शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, पोलीस उपनिरीक्षक शामराव गव्हाणे यांनी पोलीस पथकांसमवेत नवी मुंबई येथे जाऊन तपास करून अटक केली.

या तपास कामात पोलीस अजित वरपे, अरुण माळी, लक्ष्मण भांगे, ठेंगल, मनीष पवार, ज्ञानेश्वर घोंगडे, फिरोज बारगीर, अजित गोसावी, विक्रांती लगदिवे, सायबर शाखेचे रतन जाधव आदींनी परिश्रम घेतले.

-----

सराईत गुन्हेगार

नवी मुंबई, ठाण्यातही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. चारही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक कार व रोख रकमेसह २ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. हे आरोपी अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्यावर टेंभुर्णी, कुर्डुवाडी, बारामती, नवी मुंबई, ठाणे येथे अनेक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती धाराशिवकर यांनी दिली.